Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड फोटोग्राफरच्या ‘ऑनलाईन सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 11 तरुणींची सुटका

कस्टमर आणि मुलगी हे दोघेही ऑनलाईन पद्धतीने एकमेकांसी संपर्क साधत "परफॉर्म" करत असल्याची माहिती समोर आली आहे . (Bollywood Photographer Sex Racket)

बॉलिवूड फोटोग्राफरच्या 'ऑनलाईन सेक्स' रॅकेटचा पर्दाफाश, 11 तरुणींची सुटका
बॉलिवूड फोटोग्राफर नासीर खान
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 10:44 AM

मुंबई : लॉकडाऊनमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड पडलेल्या बॉलिवूडच्या एका फोटोग्राफरने सेक्स रॅकेट सुरु केलं. नासिर खान याने करण ठाकूर अशा खोट्या नावाने वेश्याव्यवसाय सुरु केला. मात्र मुंबई क्राईम ब्रांचने हे रॅकेट उद्ध्वस्त करत त्याला अटक केली आहे. (Bollywood Photographer Nasir Khan Online Sex Racket Busted by Mumbai Crime Branch)

महाराष्ट्रासोबतच देशाच्या अनेक भागात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. पण असामाजिक तत्व गुन्हे किंवा अनधिकृत धंदे करण्याचा कुठला ना कुठला मार्ग शोधून काढतात. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या बोलिवूडच्या एका फोटोग्राफरने अनोख्या पद्धतीने चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा धंदा सुरु केला होता.

खोट्या नावाने सेक्स रॅकेट

आरोपी नासिर खान याने करण ठाकूर हे खोटं नाव घेऊन सेक्स रॅकेट सुरु केलं. खरं तर नासिर बॉलिवूडमध्ये फोटोग्राफर होता. पण लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने त्याने ऑनलाईन पद्धतीने आपली एक टोळीच तयार केली होती.

काय होती मोडस ऑपरेंडी?

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांना बाहेर जाता येत नाही. अत्यावश्यक असेल तर शासनाची किंवा पोलिस खात्याची परवानगी घेऊन बाहेर जावे लागते. म्हणून आरोपीने अनोख्या पद्धतीने ऑनलाईन सेक्स करण्याचा धंदा सुरु केला. ज्यामध्ये कस्टमर आणि मुलगी हे दोघेही ऑनलाईन पद्धतीने एकमेकांसी संपर्क साधत “परफॉर्म” करत असल्याची माहिती समोर आली आहे .

प्रमुख आरोपीने एक टोळीच तयार केली होती, www.massagerepublic.Com, www.adultfriendfinder.com, www.eurogrillsescort.com अशा वेबसाईटवर मुलींचा फोटो आणि मोबाईल नंबर अपलोड केला जात होता. जर कोणी संपर्क साधला, तर सर्व काही “फिक्स” झाल्यानंतर पैसे ऑनलाईन घेतले जात होते.

11 पीडित मुलींची सुटका

हा प्रकार अत्यंत आगळा वेगळा होता. कारण अनेकांना घरातून बाहेर पडता येत नाही. अशा लोकांसाठी हा ऑनलाईन प्रकार सुरु करणारा आरोपी हा बॉलिवूडचा फोटोग्राफर असून या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.

आरोपी कर्नाटकला पसार

यापूर्वी गुन्हे शाखेने ऑनलाईन सेक्स रॅकेटवर कारवाई केली होती. टोळीच्या 6 आरोपींना अटक करुन जवळपास 11 पीडित मुलींची सुटका करण्यात आली होती. मात्र पूर्वी केलेल्या कारवाई दरम्यान मुख्य आरोपी कर्नाटकला निघून गेला होता. तो मुंबईत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसानी पाळत ठेवली आणि मुख्य आरोपीला अंधेरी परिसरातून अटक करण्यात आली आहे.

मुख्य आरोपीला जेव्हा अटक केली गेली त्यावेळी त्याच्यासोबत 3 मुली होत्या. त्यांनाही रेस्क्यू करण्यात आले आहे. हे रॅकेट चालवणारा बॉलिवूडचा फोटोग्राफर होता. त्याच्यासोबत आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून अकरा मुलींची सुटका करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये इतर कोणी आहे का, याचाही शोध गुन्हे शाखेचे अधिकारी घेत आहेत.

संबंधित बातम्या :

मॉडेलिंगचे अमिष दाखवून 14 वर्षीय मुलगी वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप

भोजपुरी सिनेमातील तरुणींना वेश्या व्यवसायात ढकललं, मीरा रोडमध्ये दोघांना अटक

(Bollywood Photographer Nasir Khan Online Sex Racket Busted by Mumbai Crime Branch)

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.