Crime : दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या अधिकाऱ्याच्या गाडीखालीच ठेवला बॉम्ब, शिर्डीतून आरोपी ताब्यात- प्रकरणाला दहशतवादाची किनार
एसआय दिलबाग सिंह यांच्या गाडीखाली बॉम्ब ठेवतानाची घटना एका सीसीटीव्हीमध्ये आली आहे. त्यांच्या घरासमोर गाडी पार्कींग केली असता पांढरे कुर्ते घातलेले दोन अनोळखी लोक कारच्या तळाशी बॉम्ब ठेवताना दिसून आलेत. या घटनेपूर्वीही दिलबाग सिंह यांना अनेकदा धमक्या आल्या होत्या. त्यांची कार वाश करणाऱ्याच्या ही बाब लक्षात आली आणि त्याने हा प्रकार सिंह यांना सांगितला.
मुंबई : (Against terrorism) दहशतवादा विरोधात कारवाया करणारे अधिकारी हे बोटावर मोजण्याइतपत आहेत. यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे तो, (Panjab) पंजाबचे एसआय दिलबाग सिंह यांचा. एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, याच अधिकाऱ्याच्या गाडीखाली लावून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल होता. या प्रकरणामध्ये एका आरोपीला थेट (Shirdi) शिर्डीतून ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादाविरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यालाच टार्गेट केल्याने यासह इतर आरोपींचा दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. त्याअनुशंगाने आरोपींना पंजाब पोलीसांनी ताब्यात घेतले असून आता पुढील तपास सुरु आहे.
सीसीटीव्हीमुळे प्रकरण आले समोर
एसआय दिलबाग सिंह यांच्या गाडीखाली बॉम्ब ठेवतानाची घटना एका सीसीटीव्हीमध्ये आली आहे. त्यांच्या घरासमोर गाडी पार्कींग केली असता पांढरे कुर्ते घातलेले दोन अनोळखी लोक कारच्या तळाशी बॉम्ब ठेवताना दिसून आलेत. या घटनेपूर्वीही दिलबाग सिंह यांना अनेकदा धमक्या आल्या होत्या. त्यांची कार वाश करणाऱ्याच्या ही बाब लक्षात आली आणि त्याने हा प्रकार सिंह यांना सांगितला. तेव्हा सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही सर्व घटना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्तींकडून घडल्याचे समोर आले आहे. दिलबाग सिंह हे दहशतवादविरोधी कारवायांमध्ये खूप सक्रिय आहेत. त्यामुळेच अशाप्रकारे कट रचून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचा संशय आहे.
अडीच किलोचा आयईडी, पाकिस्तानचे कनेक्शन काय?
सिंह यांच्या गाडीखाली ठेवण्यात आलेला बॉम्ब हा अडीच कोलोचा होता. शिवाय यासाठी वापरण्यात आलेले आयईडी हा तरनतारन येथून जप्त करण्यात आलेला आणि पाकिस्तानमधून आलेला हा आयईडी असल्याचं दिसतंय. त्यामुळे ह्या प्रकरणाचा दहशतवादाच्या अनुशंगानेही तपास केला जात आहे. तपासासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत, तर दिलबाग सिंह हे एक क्षमतावान अधिकारी असल्याचे एडीजीपी ढोके यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र पोलीसांच्या मदतीने आरोपी अटकेत
या प्रकरणात दोन आरोपी हे यापूर्वीच अटक करण्यात आलेले आहेत. हे आरोपी परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान, याची चौकशी सुरु असतानाच एक आरोपी हा महाराष्ट्रात गेल्याची माहिती पंजाब पोलीसांनी लागली होती. त्यानुसार राजेंद्र नामक व्यक्तीला शिर्डी येथून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय याकरिता पंजाब पोलीसांनी महाराष्ट्र पोलीसांची मदत घेतली होती. आता हा आरोपी पंजाब पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरु आहे. इतर दोन आरोपींना दोन्ही आरोपींना दिल्ली विमानतळावरून पकडण्यात आले होते. हे दोन्ही संशयित परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.