Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुही चावला सही करण्यासाठी कोर्टात पोहोचली, आर्यन खानची पुढच्या दोन तासात जेलमधून सुटका होण्याची शक्यता

कोर्टाच्या जामीन मंजूर केल्याची ऑर्डर जोपर्यंत ऑर्थर रोड जेलच्या जेलरपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याची जेलमधून सुटका होणार नाही. त्याची सूटका होण्यासाठी आता पुढची प्रक्रिया सुरु झाली आहे.

जुही चावला सही करण्यासाठी कोर्टात पोहोचली, आर्यन खानची पुढच्या दोन तासात जेलमधून सुटका होण्याची शक्यता
अभिनेत्री जुही चावला
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 6:34 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात काल कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. पण जामीन मंजूर झाल्यानंतर नियमानुसार त्याची लगेच जेलमधून सुटका होणार नाही. कोर्टाच्या जामीन मंजूर केल्याची ऑर्डर जोपर्यंत ऑर्थर रोड जेलच्या जेलरपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याची जेलमधून सुटका होणार नाही. त्याची सूटका होण्यासाठी आता पुढची प्रक्रिया सुरु झाली आहे. जामीन मंजूर झाल्याची ऑर्डर लवकरच ऑर्थर रोड जेलपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पुढच्या दोन तासात आर्यनची जेलमधून सुटका होण्याची दाट शक्यता आहे. तसेच आर्यन खानच्या जामिनावर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला सेशन्स कोर्टात पोहोचली आहे.

वकील नेमकं काय म्हणाले?

आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार आर्यनची जेलमधून सुटका होण्यासाठी अजून दोन ते तीन तास लागू शकतात. कोर्टाकडून आपल्याला जामीनाची ऑर्डर मिळालेली आहे. एकदा न्यायाधीशांनी जामीनाला अनुमती दिली की पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. ही सगळी प्रक्रिया आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.

अभिनेत्री जुही चावला आर्यनच्या जामीनावर सही करण्यासाठी सेशन्स कोर्टात दाखल झाली आहे. सेशन्स कोर्टात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडत आहे. या जामीन ऑर्डरवर जुही चावला गॅरेंटर म्हणून सही करेल. त्या सहीचे कायदपत्रे ऑर्थर रोड जेल प्रशासनाकडे पाठवण्यात येतील. त्यानंतर आर्यनला जेलमधून सोडण्यात येईल.

ऑर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुखच्या चाहत्यांची गर्दी

शाहरुख खान आणि आर्यन खानला पाहण्यासाठी मन्नत आणि ऑर्थर रोड जेलबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमलेली आहे. जेलबाहेर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा : Aryan Khan Bail | आर्यन खानचा जामीन आदेश जारी, तुरुंगाबाहेर येण्यासाठी मान्य कराव्या लागल्या ‘या’ अटी!

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.