इमारतीखाली उभ्या असलेल्या आईला बोलावत होता चिमुकला, अठराव्या मजल्यावरील बालकनीतून तोल गेला अन्…

हायप्रोफाईल इमारतीत बालकनीतून पडून लहान मुलांच्या मृत्यूच्या अनेक घटना वारंवार घडत आहेत. या घटना पाहता मुलाच्या सुरक्षेकडे लक्ष देणं महत्वाचं आहे.

इमारतीखाली उभ्या असलेल्या आईला बोलावत होता चिमुकला, अठराव्या मजल्यावरील बालकनीतून तोल गेला अन्...
इमारतीच्या अठराव्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 10:45 AM

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बालकनीत उभा राहून 12 वर्षाचा मुलगा इमारतीखाली असलेल्या आईला खाली वाकून हाक मारत होता. खाली वाकून पाहताना तोल गेल्याने अठराव्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल नाही. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. मुलांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.

बालकनीतून आईला हाक मारायला वाकला अन् तोल गेला

ग्रेटर नोएडातील बिसरख परिसरातील एका हायप्रोफाईल सोसायटीत ही घटना घडली. मयत मुलगा सातव्या इयत्तेत शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेवेळी मुलगा घरी एकटाच होता. आई-वडिल दोघेही कामानिमित्त बाहेर गेले होते. मुलगा अठराव्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटच्या बालकनीत उभा होता. यावेळी त्याने इमारतीखाली आईला उभी असलेली पाहिली. तो बालकनीतून खाली वाकून आईला हाक मारत होता. यावेळी त्याचा तोल गेला आणि अठराव्या मजल्यावरुन तो खाली कोसळला.

तात्काळ डॉक्टरकडे नेले, पण उशीर झाला होता

जखमी अवस्थेत मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील असून, नोकरीनिमित्त ग्रेटर नोएडात राहते. याबाबत पोलिसात अद्याप नोंद झालेली नाही. याआधाही गेल्या महिन्यात नोएडा सेक्टर 78 मध्ये आठव्या मजल्यावरील बालकनीतून पडून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी घडली होती.

हे सुद्धा वाचा

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.