प्रेयसीचा विवाह प्रियकराला मान्य नव्हता, त्यानं असं काही गिफ्ट दिलं, होणाऱ्या नवऱ्याचं अख्ख कुटुंबच हादरलं !

प्रियकर आणि प्रेयसीमध्ये काही कारणातून वाद झाला. मग प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी लग्न लावून देण्यात आले. पण प्रियकराला ही बाब रुचली नाही. त्याने जे केले ते पाहून सर्वच हादरले.

प्रेयसीचा विवाह प्रियकराला मान्य नव्हता, त्यानं असं काही गिफ्ट दिलं, होणाऱ्या नवऱ्याचं अख्ख कुटुंबच हादरलं !
लग्नात आलेले गिफ्ट पहायला गेले अन् नको ते घडलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 3:52 PM

कबीरधाम : छत्तीसगडमधील कबीरधाम येथे खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी लग्न झाले म्हणून प्रियकराने केले ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. तीन दिवसापूर्वीच तरुणाचा विवाह झाला होता. विवाहत एक म्युझिक सिस्टिम गिफ्ट आला होता. लग्नानंतर सर्वजण लग्नातील गिफ्ट पाहत होते. म्युझिक सिस्टम पाहून घरच्यांनी तो प्लगला लावला आणि सुरु करताच मोठा धमाका झाला. यात नवरदेवासह त्याचा भाऊ ठार झाला, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

गिफ्ट आलेल्या म्युझिक सिस्टममध्ये स्फोट

छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात हेमेंद्र मारवी या तरुणाचा 1 एप्रिल रोजी विवाह झाला होता. यावेळी जोडप्याला लग्नात एक म्युझिक सिस्टम गिफ्ट मिळाले होते. लग्नानंतर तीन दिवसांनी सोमवारी घरचे सर्वजण लग्नात आलेले गिफ्ट पाहत होते. यावेळी सर्वजण गिफ्ट आलेले म्युझिक सिस्टम लावून पाहत होते. मात्र म्युझिक सिस्टम प्लगला लावून सुरु करताच त्याचा स्फोट झाला. या स्फोटात हेमेंद्रसह त्याच्या भावाचा जागीच मृत्यू झाला. या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत.

स्फोट प्रकरणी मोठा खुलासा

घटनेची माहिती पोलिसांना मंगळवारी मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. या प्रकरणाच्या तपासानंतर पोलिसांनी म्युझिक सिस्टीममध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. वधूच्या पहिल्या प्रियकरानेच हा स्फोट घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. प्रेयसीने दुसऱ्याशी विवाह केल्याने तिला अद्दल घडवण्यासाठी आरोपीने हे कृत्य केले.

हे सुद्धा वाचा

वधूच्या प्रियकराने घडवला स्फोट

खरे तर हे संपूर्ण प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे. मध्य प्रदेशात राहणाऱ्या संजू मरकम या तरुणाचे ललिता नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला आणि प्रेयसी ललिताच्या नातेवाईकांनी तिचे हेमेंद्र मेरावीशी लग्न लावून दिले. यामुळे संजूने प्रेयसीला इजा पोहचवण्याचा प्लॅन केला होता.

आरोपीने प्रेयसीला लग्नाचे गिफ्ट देण्यासाठी होम थिएटर विकत घेतले आणि त्यात स्फोटके भरुन प्रेयसीच्या सासरच्या घरी पाठवली. पोलिसांनी आरोपी सरजू मरकम या नवविवाहित महिलेचा प्रियकर याला अटक केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.