दीड शहाणी नवरी, लग्नाचं सासूला निमंत्रण नाही, सासऱ्याला हृदय विकाराचा झटका, तरीही थाटमाट, एका लग्नाची विचित्र गोष्ट

आपलं लग्न थाटामाटात व्हावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. याशिवाय लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी खास असतो. हा दिवस आयुष्यभर लक्षात राहावा, असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. लग्नात सगळ्यांचा थाटमाट व्हावा, कुणीही नाराज होऊ नये, असा प्रयत्न असतो.

दीड शहाणी नवरी, लग्नाचं सासूला निमंत्रण नाही, सासऱ्याला हृदय विकाराचा झटका, तरीही थाटमाट, एका लग्नाची विचित्र गोष्ट
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 8:11 PM

आपलं लग्न थाटामाटात व्हावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. याशिवाय लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी खास असतो. हा दिवस आयुष्यभर लक्षात राहावा, असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. लग्नात सगळ्यांचा थाटमाट व्हावा, कुणीही नाराज होऊ नये, असा प्रयत्न असतो. तसेच वऱ्हाडींना पोटभर जेवण मिळावं, यासाठी लगीन कार्य असलेल्या घरातील माणसं प्रचंड मेहनत घेत असतात. प्रत्येक नातेवाईकांची आदराने विचारपूस केली जाते. प्रत्येकाला योग्य मानपान दिला जातो. पण एका लग्नाची विचित्र गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या लग्नातील दीड शहाणी नवरीचा शहाणपणा किती जणांना त्रासदायी ठरतो, ते यातून दिसलं आहे.

संबंधित नवरीच्या विचित्र वागणुकीबाबत Online Platform Reddit वर माहिती देण्यात आली आहे. ही घटना नेमकी कुठली आहे ते आम्ही काही कारणास्तव सांगू शकत नाहीत. पण लग्नातील नवरी किती निर्दयी आणि विचित्र होती त्याचा अनुभव लग्नात गेलेल्या प्रत्येकाला आला आहे. विशेष म्हणजे या लग्नाची कर्ताधर्ता ही नवरीच होती. म्हणजे सर्व कामांची सूत्रे तिनेच हातात घेतले होते. तिने लग्नात फक्त पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली होती. त्यातही इतकी कंजूसी करण्यात आली होती की पाहुण्यांचंही पोट भरलं नाही. त्यामुळे लग्नाला आलेले बरेच जण भडकले. विशेष म्हणजे लग्नात अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या.

नवरदेवाच्या आई-वडीलांसाठी वाईट दिवस

विशेष म्हणजे मुलाचा लग्नाचा दिवस हा आई-वडिलांसाठी खास दिवस असतो. आई-वडिलांच्या या दिवशी खूप अपेक्षा असतात. पण या लग्नात नवरदेवाच्या आई-वडिलांच्या अपेक्षाभंग झाल्या. विशेष म्हणजे लग्नासाठी मुलाच्या आईने पैसे दिले होते. तरीदेखील नवरीने तिच्या सासूला लग्नासाठी बोलावलं नाही. या लग्नात सासरे हजर होते. पण लग्नातील एकंदरीत परिस्थिती बघता ते नाराज होते. यादरम्यान त्यांना लग्न मंडपातच हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतरही लग्न साध्या पद्धतीत करण्यात आलं नाही. विशेष म्हणजे लग्नादरम्यान काही पाहुणे नवरीला तिच्या सासऱ्याच्या तब्येतीबाबत विचारायचे तेव्हा तिला राग यायचा. विशेष म्हणजे नवरदेव जेव्हा आपल्या वडिलांच्या तब्येतीबाबत पाहुण्यांना माहिती देत होता तेव्हा नवरीला त्याचा राग आला.

लग्नात जेवणाचे देखील वांदे

सर्वसाधारणपणे लग्न म्हणजे होऊ दे खर्च असं म्हटलं जातं. लग्नात जेवणाची मुबलक व्यवस्था केली जाते. पण या लग्नात गेलेल्या पाहुण्यांना तर विचित्रच अनुभव आला. या लग्नात नवरीने 200 पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे जेवणासाठी चिकनची डीश होती. पण प्रत्येकाला एकच चिकनचा पिस मिळेल, असा नियम ठेवण्यात आला होता. त्यामुळे पाहुण्यांचं पोट भरलं नाही. तसेच अनेकजण उपाशीच राहिले. या लग्नाबाबत जेव्हा लोकांनी सोशल मीडियावर माहिती शेअर केली तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

हेही वाचा :

स्किजोफ्रेनिया आजाराच्या नावाने लाखो लुबाडले, रुग्णांना गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड पटविण्याचा सल्ला, विरारमध्ये बोगस डॉक्टराचा भंडाफोड

महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येनंतर अयोध्येत आणखी एका साधूचा संशयास्पद मृत्यू, मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.