मुलगा पसंत नाही.. लग्नाआधीच नवरीने रचला भयानक कट, 5 जणांना अटक
होणाऱ्या नवऱ्या मुलीला तिचा भावा नवरा पसंत नसल्याने नकार द्यायचा सोडून, तिने थेट त्याचा काटा काढण्याचं ठरवलं. होणाऱ्या नवऱ्याला संपवण्यासाठी नवरी मुलीने सहा जणांसह कट रचला आणि त्या मुलाला जीवे मारण्याची थेट सुपारी दिली.

आई-वडिलांच्या पसंतीने अरेंज मॅरेजसाठी दाखवण्याचा कार्यक्रम झाला, लग्नही ठरलं. पण होणाऱ्या नवऱ्या मुलीला तिचा भावा नवरा पसंत नसल्याने नकार द्यायचा सोडून, तिने थेट त्याचा काटा काढण्याचं ठरवलं. होणाऱ्या नवऱ्याला संपवण्यासाठी नवरी मुलीने सहा जणांसह कट रचला आणि त्या मुलाला जीवे मारण्याची थेट सुपारी दिली. त्याच्या खुनासाठी त्या मुलीने तब्बल दीड लाख रुपयेही दिले होते. मात्र हा गुन्हा उघडकीस आला आणि याप्रककरणी पोलिसांनी पाच जणांना अटक करत बेड्या ठोकल्या. दौंड तालुक्यातील धक्कादायक घटनेमुळे मोठा खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील हा भयानक प्रकार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात राहणाऱ्या मयुरी सुनील दांगडे या तरूणीचं लग्न कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्याशी ठरलं होतं. मात्र मयुरीला काही होणार नवरा पसतं नव्हता. मयुरीला सागर सोबत लग्न करायचं नसल्याने तिने सागरला ठार मारून त्याचा काटा काढण्याचाच कट रचला. सागरला जीवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे या दोघांनी तब्बल 1 लाख 50 हजार रुपयांची सुपारी दिली. हा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या तपासात समोर आला.
सागर हा एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतो. त्याचं मयुरीशी लग्न ठरलं. पण तिला तो पसंत नसल्याने तिने त्याला मारण्यासाठी दीड लाखांची सुपारी दिली. आरोपींनी त्याची सुपारी घेतली आणि खामगाव फाटा येथे सागरला अडवलं. तू मयूरीशी लग्न केलंस तर तुला इंगा दाखवतो, असं म्हणत आरोपींनी सागरला लाकडी दांडक्याच्या सहाय्याने जबर मारहाण केली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
याप्रकरण सागरने पोलिसांत तक्रार नोंदवल्यानतंर पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे,शिवाजी रामदास जरे,सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, जीवे मारण्याची सुपारी देणारी मयुरी दांडगे ही सध्या फरार आहे. पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.