लंडन : एका ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याने गुप्तपणे 50 हून अधिक महिला मॉडेल्सचे अश्लील फोटो काढून व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी त्याने सिक्रेट स्पाय कॅमचा (Spy Camera) वापर केल्याचा आरोप केला जात आहे. आरोपी पोलीस अधिकारी सेक्स अॅडिक्ट असल्याचं वकिलांनी कोर्टात सांगितलं.
काय आहे प्रकरण?
‘मिरर यूके’ने दिलेल्या माहितीनुसार 40 वर्षीय पोलीस अधिकारी नील कॉर्बेल (Neil Corbel) याने 2017 ते 2020 या काळात 51 महिलांशी ऑनलाईन डेटिंग साईटवरुन संपर्क साधला. भेटीच्या बहाण्याने त्यांना हॉटेलमध्ये नेऊन गुप्तपणे त्यांचे अश्लील फोटो शूट केले. त्यानंतर त्यांचे व्हिडीओ तयार केले.
चष्मा ते चार्जर, स्पाय कॅममधून शूटिंग
नील कॉर्बेलने महिलांचे फोटो शूट करण्यासाठी अनेक सिक्रेट उपकरणांचा वापर केल्याचा आरोप आहे. कॅमेरा, डिजिटल अलार्म घड्याळ, भिंतीवरील घड्याळ, हेडफोन, चार्जर, लॅपटॉप आणि चष्म्यातूनही व्हिडीओ सिक्रेटली रेकॉर्ड केले जात होते. तपास पथकाला आतापर्यंत एकूण 51 रेकॉर्डिंग सापडले आहेत. ज्यामध्ये महिलांचे अश्लील फोटो-व्हिडीओ आहेत.
आतापर्यंत 31 महिलांची ओळख पटली आहे, त्यापैकी 19 महिलांनी आरोपी नील कॉर्बेल याच्या विरोधात जबाब देण्याची तयारी दर्शवली आहे. स्टमिंस्टर मजिस्ट्रेट कोर्टच्या सुनावणीत पीडित महिलांपैकी 16 मॉडेल आणि तीन सेक्स वर्कर हजर होत्या. मॉडेल्सकडून केवळ फोटोशूटची परवानगी घेण्यात आली होती.
पोलखोल कशी झाली
एका फोटोशूटच्या वेळी नील कॉर्बेलचं घड्याळ महिलेला विचित्र वाटलं. तिने घरी जाऊन त्या ब्रँडविषयी गूगलवर माहिती सर्च केली असता तो स्पाय कॅम असल्याचं तिला समजलं. यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. याचप्रमाणे तो गुप्त कॅमेरा असलेल्या चष्म्यामुळेही रंगेहाथ पकडला गेला.
संबंधित बातम्या :
पुण्यात सराईत वाहनचोर अटकेत, 51 दुचाकींसह 36 लाखांचा मुद्देमाल जप्त
पत्नीच्या प्रियकराची हत्या, मृतदेह हातभट्टीत जाळून राख शेळीसोबत पुरली, पिंपरीत ‘दृश्यम’ स्टाईल खून
धक्कादायक! सहकाऱ्याने लग्न मोडलं, छळवणुकीला कंटाळून पुण्यात महिला पोलिसाची आत्महत्या