दुबईत असतानाही भारतातील अपहरणाच्या गुन्ह्यात अडकवले, व्यापाऱ्याची परमबीर सिंग-प्रदीप शर्मांविरोधात तक्रार

दुबईत असलेली व्यक्ती भारतात अपहरण कस करु शकते, असा प्रश्न कोर्टानेही उपस्थित केला होता. (Munir Khan Param Bir Singh)

दुबईत असतानाही भारतातील अपहरणाच्या गुन्ह्यात अडकवले, व्यापाऱ्याची परमबीर सिंग-प्रदीप शर्मांविरोधात तक्रार
परमबीर सिंह, प्रदीप शर्मा
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:44 AM

नवी मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) आणि पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्या विरोधात आणखी एका व्यापाऱ्याने तक्रार केली आहे. भोपाळमध्ये राहणारे व्यापारी मुनिर खान (Munir Khan) यांनी राज्य सीआयडीकडे तक्रार नोंदवली आहे. आपण दुबईत असतानाही भारतात घडलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप मुनिर खान यांनी केला आहे. त्यामुळे परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Businessman Munir Khan records statement against Param Bir Singh Pradeep Sharma in Kidnap Case)

सट्टेबाजी ते अपहरण

2018 मध्ये क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी केल्या प्रकरणी ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात बुकी सोनू जालान आणि इतरांवर कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात मुनिर खान यांनाही आरोपी करण्यात आलं होतं. काही महिन्यानंतर खंडणी विरोधी पथकाने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर मोक्का कायद्यात बदलण्यात आला.

परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचा दावा मुनिर खान यांनी केला आहे. या गुन्ह्यात सोनू जालान याला अटक करण्यात आली होती. अपहरणाच्या या गुन्ह्यात आरोपींवर मोक्का लावण्यात आला होता.

अपहरणाच्या वेळी दुबईत असल्याचा दावा

22 जानेवारी 2018 रोजी अपहरण झाल्याचं तक्रारदाराचं म्हणणं होतं. या गुन्ह्यात मुनिर खान यांनाही आरोपी करण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात 9 जानेवारी 2018 ते 29 जानेवारी 2018 या कालावधीत मुनिर खान हे दुबई येथे होते. ते जेव्हा अटक टाळण्यासाठी कोर्टात गेले तेव्हा कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं. त्याचप्रमाणे दुबईत असलेली व्यक्ती भारतात अपहरण कस करु शकते, असा प्रश्नही कोर्टाने उपस्थित केला होता.

मुनिर खान यांचा परमबीर सिंगांविरोधात जबाब

सोनू जालान याने काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पांडे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश राज्य सीआयडी विभागाला दिले आहेत. त्यानुसार सीआयडी विभाग याची चौकशी करत आहे. तपास अधिकाऱ्यांकडे हजर राहून मुनिर खान यांनी काल सविस्तर जबाब तर दिलाच, त्याच प्रमाणे त्यांच्याकडे कसे पैसे मागण्यात आले, कोणी पैसे मागितले, कोणच्या वतीने पैसे मागितले, यात परमबीर सिंग, प्रदीप शर्मा यांची काय भूमिका होती, याबाबत सविस्तर माहिती दिली.

संबंधित बातम्या :

बुकी सोनू जालान ते पीआय डांगे, परमबीर सिंग यांच्यावरील तीन आरोपांची गोपनीय चौकशी

परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध? पोलीस निरीक्षक अनुप डांगेंच्या आरोपांचीही चौकशी होणार

परमबीर सिंगांनी टाळलं, चित्रपट निर्माते भरत शाहांचा नातू यश मेहतावर दीड वर्षांनी आरोपपत्र

(Businessman Munir Khan records statement against Param Bir Singh Pradeep Sharma in Kidnap Case)

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.