अवघ्या दोन रुपयांसाठी अंध भिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला, अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील लाजिरवाणी घटना
अंबरनाथ रेल्वे स्थानकावर एक लाजिरवाणी घटना घडली आहे. एका कॅन्टीन चालकाने अवघ्या दोन रुपयांसाठी अंध भिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे (canteen owner beat blind beggar at Ambernath Railway Station)
ठाणे : अंबरनाथ रेल्वे स्थानकावर एक लाजिरवाणी घटना घडली आहे. एका कॅन्टीन चालकाने अवघ्या दोन रुपयांसाठी अंध भिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आठ रुपयांच्या समोसा दहा रुपयांना का देता? फक्त इतकेच विचारले असता कॅन्टीन चालकाने अंध भिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार केला. याप्रकरणी कल्याण जीआरपीने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. केवळ दोन रुपयांसाठी कॅन्टीन चालकाकडून अंध भिकाऱ्यावर हल्ला केल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे (canteen owner beat blind beggar at Ambernath Railway Station).
नेमकं प्रकरण काय?
अंबरनाथमध्ये राहणारे दिलीप मोरे हे अंध आहेत. ते भीक मागून आपल्या कुटुंबयांचा उदरनिर्वाह करतात. रविवारी (25 एप्रिल) संध्याकाळी दिलीप मोरे त्यांच्या मित्रासोबत अंबरनाथ स्थानकाच्या फलाटावर गप्पा मारत होते. यावेळी त्यांनी एका कॅन्टीनमधून समोस घेतला. कॅन्टीन चालकाने या समोस्याचे दहा रुपये मागितले.
दिलीप मोरे यांच्या बोटाला गंभीर दुखापत
दिलीप मोरे यांनी कॅन्टीन चालकाला आठ रुपयाचा समोसा दहा रुपयाला कसा काय देता? असा प्रश्न विचारला. या कारणावरुन कॅन्टीन चालक आणि दिलीप मोरे यांच्यात वाद सुरु झाला. या वादादरम्यान कॅन्टीन चालक मंगलसिंग कुशवहा याने आपल्याजवळ असलेल्या तीक्ष्ण धारदार शस्त्राने दिलीप मोरेंवर प्रहार केला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली.
पोलिसांची भूमिका काय?
या प्रकरणी कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अर्चना दुसाणे यांनी प्रतिक्रिया दिली. या घटनेसंदर्भात कॅन्टीन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीर कारवाई केली जाईल, असं दुसाणे यांनी सांगितलं (canteen owner beat blind beggar at Ambernath Railway Station).
हेही वाचा : कोरोनाबाधित मृताच्या बोटाचे ठसे वापरले, ‘फोनपे’तून पैसे ट्रान्सफर, जालन्यातील वॉर्डबॉयचा प्रताप