पालघर : वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तब्बल सहा विद्यार्थ्यांचा अपघातात (Accident) मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या दुर्दैवी घटनेमळे सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातातील मृतांमध्ये आमदाराचा मुलगादेखील आहे. ही घटना ताजी असतानाच आता अंगाचा थरकाप उडवणारी आणखी एक घटना घडली आहे. पालघरमध्ये (Palghar Accident) भरधाव कारने बीचवरील 6 पर्यटकांना चिरडले आहे. चिंचणी बीचवरील ही घटना असून यामध्ये सहापैकी पाज जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पोलिसांनी (Police) वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अपघाताची ही घटना 26 जानेवारी रोजी घडली. पालघरमधील चिंचणी बीचवर बरेच पर्यटक आले होते. 26 जानेवारीनिमित्त सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची संख्या बरीच होती. यावेळी एक माथेफिरू कार चालक भरधाव वेगात कार चालवत होता. त्याचे कारवरील नियंत्रण अचानकपणे सुटले. परिणामी कारने तब्बल सहा जणांना चिरडले. या घटनेत सहाही पर्यटक गंभीर जखमी झाले. घटना घडल्यानंतर बाकीच्या पर्यटकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. जखमी पर्यटकांना चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
ही घटना घडल्यानंतर बाकीच्या नागरिकांनी कार चालकाला घेराव घालून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी चालकासह आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. तर सहापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या बाकीच्या पाच पर्यटकांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री वर्धा जिल्ह्यात अतिशय थरारक आणि अंगाचा थरकाप उडवणार अपघात घडला. वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील सेलसुरा गावातील नदीच्या पुलावरुन चारचाकी खाली कोसळल्यानं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तब्बल सहा विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश आहे. सहा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इतर बातम्या :