Goa Accident : गोव्यात टॅक्सीला ओव्हरटेक करण्याच्या नादात कार नदीत पडली, चौघांचा बुडून मृत्यू

झुआरी पुलावरुन बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास डस्टर कार भरधाव वेगात चालली होती. यावेळी एका टॅक्सीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारची उजव्या बाजूला असलेल्या पुलाच्या कठड्याला धडक बसली. या धडकेमुळे पुलाचा कठडा तुटून कार नदीत पडली.

Goa Accident : गोव्यात टॅक्सीला ओव्हरटेक करण्याच्या नादात कार नदीत पडली, चौघांचा बुडून मृत्यू
संशयातून तरुणावर जीवघेणा हल्लाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 6:28 PM

गोवा / देवेंद्र वालावलकर (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यातील झुआरी पुलावरुन बुधवारी मध्यरात्री कार (Car) नदीत कोसळू झालेल्या भीषण अपघाता (Accident)मध्ये चौघांचा मृत्यू (Death) झाला आहे. तब्बल 12 तासांनंतर अपघातग्रस्त डस्टर कार बाहेर काढण्यात शोध पथकाला यश आले आहे. कारचा पत्रा कापून कारमधील 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं. आल्विन आरावजो, हेन्री आरावजो, प्रेसिला क्रुझ आणि ऑस्टिन फर्नांडिस अशी अपघातात मृत झालेल्या चौघांची नावे आहेत. चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

टॅक्सीला ओव्हरटेक करण्याच्या नादात कठड्याला धडकून कार नदीत पडली

झुआरी पुलावरुन बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास डस्टर कार भरधाव वेगात चालली होती. यावेळी एका टॅक्सीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारची उजव्या बाजूला असलेल्या पुलाच्या कठड्याला धडक बसली. या धडकेमुळे पुलाचा कठडा तुटून कार नदीत पडली. ही कार लोटली येथून पणजीच्या दिशेने चालली होती. अपघातानंतर रात्रीपासून नदीत शोधकार्य सुरू होते. मात्र काळोख असल्याने शोधकार्य सुरू ठेवण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान तटरक्षक दल आणि नौदल डायव्हर्सशी संपर्क साधण्यात आला. कार बाहेर काढण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाकडून शोध आणि बचावकार्य सुरु होते. तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यास यश आले. कारमधील चौघांचाही बुडून मृत्यू झाला असून, कटरच्या साहाय्याने कारचा पत्रा कापून चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेहांची ओळखही पटवण्यात आली असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. (Car falls into river while overtaking taxi in Goa, four drown)

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.