पुणे – शहरात तुमच्या मुलाने आंतरजातीय लग्न केले. त्यामुळे तुमच्या कुटुंबावर बहिष्कार घातल्याचे सांगणाऱ्या जातपंचायतीतील 5 जणांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील दत्तवाडी पपोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित जातपंचायतीचा कार्यक्रम अरणेश्वर गवळीवाडा येथील मुक्तांगण शाळेच्या हॉलमध्ये घडला आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र समाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण कायद्यांतर्गत (Social Exclusion Act) अर्जुन रामचंद्र जानगवळी, हरीभाऊ हिरणवाळे, चंद्रकांत उर्फ बाळु औरंगे व त्यांचे इतर दोन साथीदार यांच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रामचंद्र भाऊसाहेब पंगुडवाले (वय-69 रा.गवळीवाडा, खडकी) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
काय आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र भाऊसाहेब पंगुडवाले यांचे नातेवाईक संजय नायकु यांच्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेलया समाजातील पंचानी फिर्यादी यांना तुमच्या मुलाने जातीच्या बाहेर लग्न केले आहे. त्यामुळे तुम्ही आता आमच्यात येऊ शकत नाही. तसेच आयोजकांना तुम्ही यांना का बोलावले आहे, हे जातीतून बहिष्कृत केलेले आहेत. असे म्हणत तिथून निघून जाण्यास सांगण्यात आले.
Lord Shiva Puja | आयुष्यात यश मिळवायचे असेल तर सोमवारी हे उपाय नक्की करुन पाहा