धमकी, शिवीगाळ, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील भाजप नगरसेवकावर गुन्हा

आनंद रिठे यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून संजय सुर्वे न्यावाच्या व्यक्तीनं गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय. आत्महत्या केलेल्या संजय सुर्वे यांच्या नातेवाईकांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात नगरसेवक आनंद रिठे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धमकी, शिवीगाळ, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील भाजप नगरसेवकावर गुन्हा
आनंद रिठे, भाजप नगरसेवक
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 11:10 PM

पुणे : धमकी, शिविगाळ आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील एका भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आनंद रिठे असं या भाजप नगरसेवकाचं नाव आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद रिठे यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून संजय सुर्वे न्यावाच्या व्यक्तीनं गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय. आत्महत्या केलेल्या संजय सुर्वे यांच्या नातेवाईकांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात नगरसेवक आनंद रिठे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (case filed against BJP corporator Anand Rithe in Pune)

आत्महत्या केलेल्या संजय सुर्वे यांनी दत्तवाडी इथं इमारतीवर अनधिकृत टॉवर उभा केल्याची तक्रार आनंद रिठे यांनी महापालिकेत केली होती. रिठे यांनी कारवाईची भीती दाखवत वेळोवेळी पैशाची मागणी केली आणि धमकी दिल्याची तक्रार सुर्वे यांच्या नातेवाईकांनी केली आहे. सुर्वे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार रिठे यांच्याविरोधात धमकी देणे, शिविगाळ करणे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सुर्वे आणि रिठे यांच्यातील ऑडिओ क्लिपही समोर

संजय सुर्वे आणि आनंद रिठे यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. दरम्यान, पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक आणि सुटका

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जमलेली गर्दी पक्षाच्या शहराध्यक्षांना चांगलीच महागात पडली. या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक करण्यात आली होती. मात्र जामीन मिळताच त्यांची अवघ्या काही वेळात सुटकाही झाली. जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी गर्दी जमवल्या प्रकरणी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश खुद्द अजित पवारांनीच दिले होते. त्यानुसार राष्ट्रवादीच्या दीडशे ते दोनशे पदाधिकाऱ्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र पोलिसांनी जामीन मंजूर करत त्यांची सुटकाही केली.

संबंधित बातम्या :

मायलेकाची हत्या करुन पतीची आत्महत्या? तपासाचे अनेक कंगोरे, पुण्यातील हत्याकांडाने पोलीसही चक्रावले

VIDEO : महिलांच्या दोन गटांमध्ये तुफान वाद, पुरुषही एकमेकांना भिडले, नंतर थेट पोलीस स्टेशनबाहेर कोयते नाचवले

case filed against BJP corporator Anand Rithe in Pune

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.