CCTV कॅमेरा बंद, प्रायव्हेट पार्टला विद्युत प्रवाहाचा करंट, खळबळजनक आरोपामुळे पोलिस चर्चेत
पोलिस अधिकाऱ्याने दिला प्रायव्हेट पार्टला विद्युत प्रवाह करंट, गंभीर आरोपामुळे संपुर्ण राज्यात चर्चा
राजस्थान : राजस्थान (Rajstan) राज्यातील नागौर (Nagour) भागात पोलिसांच्यावर खळबळजनक आरोप केल्यामुळे अख्खं पोलिस स्टेशन (Police Station) चर्चेत आलं आहे. एका अधिकाऱ्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. एवढ्यावरचं तो अधिकारी थांबला नाहीतर, अधिकाऱ्याने प्रायव्हेट पार्टला विद्युत प्रवाहाचा करंट दिल्याचं आरोप करण्यात आला आहे. तरुणाची अवस्था गंभीर असून त्याला हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे.
तरुणाचे नातेवाईकांनी पोलिस अधिकक्षकांच्या घरासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे. भावण्डा अधिकाऱ्याने सिद्धार्थ प्रजापत कोणतही कारण नसताना ताब्यात घेऊन बेदम मारहाण केली आहे. तो सध्या गंभीर अवस्थेत रुग्णालयात आहे. नातेवाईकांनी या प्रकरणाचा न्याय पोलिस अधिक्षकांकडे मागितला आहे. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी असं निवेदन दिलं आहे.
भावण्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरुण रामप्रसाद जाट या दुकानावरती दुधाच्या दुकानात काम करीत होता. त्यावेळी पोलिसांची गाडी आली आणि तरुणाला घेऊन गेली. महिपाल या तरुणाला घेऊन गेली, त्यानंतर पोलिसांनी तरुणाला बेदम मारहाण करीत गुप्तांगाला विद्युत प्रवाहाचा करंट दिला असा आरोप करण्यात आला आहे.