CCTV Video : नुपुर शर्माच्या समर्थनात स्टेटस ठेवल्यानं तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण, सोलापुरातील धक्कादायक प्रकार

दिवसेंदिवस नुपुर शर्मा प्रकरण अधिक तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सोलापुरात एका तरुणाला नुपुर शर्माच्या समर्थनात स्टेटस ठेवल्यामुळे बेदम मारहाण करण्यात आलीय. मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.

CCTV Video : नुपुर शर्माच्या समर्थनात स्टेटस ठेवल्यानं तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण, सोलापुरातील धक्कादायक प्रकार
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 4:36 PM

सोलापूर : भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्य, देश, विदेशात वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. शर्मा यांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम संघटना (Muslim Organization) चांगल्याच आक्रमक बनल्या आहे. देशातील विविध भागात, महाराष्ट्रातही रस्त्यावर उतरुन नुपुर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. बिहार, उत्तर प्रदेशात हिंसा भडकली. पण महाराष्ट्रात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, दिवसेंदिवस हे प्रकरण अधिक तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सोलापुरात (Solapur) एका तरुणाला नुपुर शर्माच्या समर्थनात स्टेटस ठेवल्यामुळे बेदम मारहाण करण्यात आलीय. मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.

पीडित तरुणाने सांगितलं नेमकं काय घडलं?

मारहाण झालेल्या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार त्याने नुपुर शर्मा यांच्या समर्थनात स्टेटस ठेवलं होतं. त्यामुळे नाराज झालेल्या त्याच्या मुस्लिम मित्रांनी त्याला फोनवरुन सांगितलं. त्यानंतर त्याने माफीही मागितली. त्यावेळी त्याच्या मुस्लिम मित्रांनी त्याला बोलावून घेतलं. तिथे एकूण चार जण होते. तिथेही पिडीत तरुणाने माफी मागितली आणि पुन्हा असं होणार नसल्याचं सांगितलं. पिडीत तरुण आपल्या काकाच्या घरी लपून बसला होता. त्यानंतरही मित्रांकडूनच त्याचे फोटो व्हायरल करण्यात आले. तिथे सापडेल तिथून संपर्क करा याला फोडून काढायचं आहे, असे मेसेज पसरवण्यात आले. त्यानंतर मी पोलीस ठाण्यात गेलो. तिथे पोलिसांनी समोरच्या लोकांना बोलावून हा विषय मिटवला. तिथेही मी त्यांची माफी मागितली.

पोलिसांत तक्रार, मुख्य आरोपी अद्याप मोकाट

पोलिसांनी हा विषय मिटवल्यानंतर मी घरी गेलो. त्यानंतर माझ्या ओळखीचे चारजण आणि तीन रिक्षात किमान 15 जण आले. त्यांनी मला घरातून बाहेर ओढून नेलं. जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत मला मारत घेऊन गेले. त्यांच्या हातात फायटर होते. लाथा बुक्क्यांनी मला मारहाण करण्यात आली. माझ्या मानेला आणि कानाला इजा झाली आहे. छातीवर आणि पोटावर मारहाण करण्यात आली. मी पोलिसांत तक्रार केली आहे. पण पोलिसांनी फक्त दोघा-तिघांनाच अटक केली आहे. जो मुख्य आरोपी आहे तो अजूनही गल्लीत मोकळा फिरत आहे. माफी पोलिसांना विनंती आहे की त्याला लवकरात लवकर अटक करावी, अशी प्रतिक्रिया पीडित तरुणाने माध्यमांशी बोलताना दिलीय. 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.