Accident : मॉनिंग वॉकला गेलेल्या दोघा मित्रांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू! फरार कार चालकाचा शोध घेण्याचं आव्हान
महाराष्ट्रात गेल्या काही दिवासांपासून रस्ते अपघातांची मालिकाच पाहायला मिळते आहे.
चंद्रपूर : मॉर्निंग वॉकला (Morning Walk) गेलेल्या दोन युवकांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू (two young boys killed) झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील खिर्डी इथं ही धक्कादायक घटना घडली. अज्ञान वाहन चालकांनं दोन युवकांना धडक दिल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढलाय. राजुरा- आदिलाबाद महामार्गावर (Rajura – Adilabad Highway) झालेल्या अपघातातील वाहनाचा आता पोलिसांकडून शोध घेतला जातो आहे. धनराज मालेकर आणि शेखर ढवस अशी मृत्यू झालेल्या दोघा मित्रांची नावं आहे. यातील धनराजचं वय 34 तर शेखर ढवस यांचं वय 33 वर्ष होतं. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी काही काळ रास्ता रोको केलाय. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावावर नियंत्रण मिळवंय. पाच वर्षांपूर्वी 2017 साली देखील भरधाव चारचाकी कारनं चिरडलं. उर्जानगरचा पुलाजवळ हा भीषण अपघात जानेवारी 2017 मध्ये झाला होता. या अपघातातही दोघांचा मृत्यू झाला होता. तर तिघे जखमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा चंद्रपुरात मॉर्निगला गेलेल्या दोघांवर काळानं घाला घातला आहे.
कारचालक फरार
भरधाव वाहनानं दोघा तरुणांना चिरडल्यानंतर घाबरुन घटनास्थळावरुन पळ काढलाय. या घटनेनं संतापलेल्या स्थानिकांनी महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. दरम्यान, आता पोलिसांनी या अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलिसांसमोर तरुणांना चिरडणाऱ्या अज्ञात वाहनासह वाहन चालकाचा शोध घेण्याचं आव्हान उभं ठाकलंय आहे.
राज्यात रस्ते अपघातांची मालिका
महाराष्ट्रात गेल्या काही दिवासांपासून रस्ते अपघातांची मालिकाच पाहायला मिळते आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या अपघातांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील रस्ते अपघातांची भीषण आकडेवारी काळजी वाढवणारी आहे.
नांदेडमध्ये झालेल्या अपघातात एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली होती. दुचाकीवरुन तिघे जण जात असताना एका भरधाव बसनं बाईकला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला होता. तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावरही बुधवारी रात्री कंटेनर उलटला होता. तर इकडे पुण्यात लोणी काळभोर टोलनाक्यावर दोन कारमध्ये भीषण अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. पुण्याहून यवतकडे जाणाऱ्या तसेच यवत च्या दिशेने पुण्याकडे येणाऱ्या २ गाड्यांमध्ये जोरदार टक्कर होऊन हा अपघात झाला होता. या अपघातातही मृतांमध्ये एका पादचाऱ्याचा समावेश आहे.