Special Report | अनैतिक संबंधात अडथळा, पत्नीकडून पतीचा काटा

चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीत नात्यांना काळीमा फासणारी घटना उघडकीस आलीय.

Special Report | अनैतिक संबंधात अडथळा, पत्नीकडून पतीचा काटा
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 12:00 AM

चंद्रपूर : चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीत नात्यांना काळीमा फासणारी घटना उघडकीस आलीय. ब्रह्मपुरीत राहणाऱ्या एका महिलेनं 3 महिन्यांपूर्वी आपल्या पतीची हत्या केली आणि हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचला. पण एका मोबाईलमुळं हे प्रकरण उघडकीस आलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीत राहणाऱ्या श्याम रामटेके यांची त्यांचीच पत्नी रंजना रामटेकेनं 6 ऑगस्ट 2022 रोजी हत्या केली. पण श्याम रामटेके यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रंजना रामटेकेनं केला. नागपुरात राहणाऱ्या आपल्या दोन मुलींना तिनं घरी बोलावून घेतलं. नातेवाईकही जमा झाले. अंत्यविधीही उरकला. पण तब्बल साडेतीन महिन्यांनतर श्याम रामटेके यांची हत्या त्यांच्याच पत्नीनं केल्याचं उघडकीस आलं. आणि तेही मोबाईल रेकॉर्डिंगमुळं

रंजना रामटेके ही आपल्या मुलीनं दिलेला मोबाईल वापरायची. पण वडिलांच्या मृत्यूनंतर हा मोबाईल रंजनाच्या मुलीनं स्वत:कडे घेतला. आणि त्याच मोबाईलमध्ये रंजना रामटेके आणि तिचा प्रियकर मुकेश त्रिवेदी यांच्यातलं कॉले रेकॉर्डिंग मुलीला सापडलं.

नेमकं मोबाईल रेकॉर्डिंग काय?

पत्नी- झालं प्रियकर- झालं? पत्नी-हो प्रियकर-केव्हा? पत्नी-चुलबूल नाही करत प्रियकर- आपोआप झालं का? पत्नी-नाही प्रियकर-केलं का? पत्नी-हो प्रियकर-केव्हा पत्नी-आत्ता थोडा वेळ झाला, दीड वाजता. हातपाय हलवत नाही प्रियकर- नाकात नाही का? हात लावून पाहा पत्नी-उशी मांडूनच ठेवली मी, गेला, छाती नाही हलत ना प्रियकर-हो का? आता फोन लाव ना पत्नी- आत्ताच नाही लावत कुणाला प्रियकर-किती वाजता लावाल? पत्नी-सकाळी लावेन. 7-8 वाजता, त्याला उठवून पाहिन, नाही उठला तर आरडाओरडा करेन, नाहीतर तर मग शेजारच्या बाईला बोलवेन. फडफडला ना, हात दुखून गेले माझे. गेला का नाही नाहीतर राहायचा

आपल्या वडिलांची हत्या आपल्याच आईनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं केल्याचं समजल्यानंतर श्वेता रामटेकेच्या पायाखालची जमीनच सरकली. श्वेतानं थेट पोलीस ठाणं गाठलं. आणि ती ऑडिओ क्लिप पोलिसांना ऐकवली.

पोलिसांनी रंजना रामटेकेला आणि तिचा प्रियकर मुकेश त्रिवेदीची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही आपल्या कृत्याची कबुली दिली. आपल्या प्रियकराला पतीची हत्या केल्याचं सांगताना रंजना रामटेके हसत होती. आपल्या कृत्याचा तिचा जराही पश्चाताप नव्हता.

क्षणिक सुखासाठी 50 वर्षाच्या रंजनानं आपल्या 65 वर्षाच्या पतीला संपवलं. नवरा गेलाच. आता मुलगीही दुरावली. प्रियकराचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि स्वत: रंजनावरही उरलेलं आयुष्य तुरुंगात काढण्याची वेळ आलीय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.