Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन रिलेशनशीपमध्ये तिने ‘बॉयफ्रेण्ड’ समूजन बहिणीशी केले चॅटींग; 10 वर्षांनंतर झाला उलगडा

किरत 2009 पासून फेसबुकच्या माध्यमातून बॉबी नावाच्या व्यक्तीशी बोलत होती. बॉबीने फेक फोटो टाकून फेक आयडी बनवला होता. फसवणुकीची अधिक माहिती देत 'संडे टाइम्स'शी बोलताना किरतने सांगितले की, ती ज्या 'बॉबी'शी बोलत होती ती प्रत्यक्षात तिची बहीण सिमरन भोगल आहे.

ऑनलाईन रिलेशनशीपमध्ये तिने 'बॉयफ्रेण्ड' समूजन बहिणीशी केले चॅटींग; 10 वर्षांनंतर झाला उलगडा
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 12:07 AM

Internet relationship: लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या गेलेल्या असतात, असे म्हटले जाते. हल्ली त्या ऑनलाइनच्या माध्यमातून जुळल्या जात आहेत. पण अशा ऑनलाईन रिलेशनशिपमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. एक तरुणी अशाच ऑनलाईन रिलेशनशीपमध्ये अडकली. तिने एक-दोन नव्हे तर चक्क दहा वर्षे या रिलेशनशीपचा आनंद घेतला. पण शेवटी तिला या रिलेशनशीपची वस्तुस्थिती कळली, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मागील दहा वर्षे ती ज्याच्याशी चॅटींग करीत होती, तो बॉयफ्रेण्ड नव्हे तर तिची चुलत बहिणच असल्याचे तिच्या निदर्शनास आले आहे. तरुणीने या रिलेशनशीपमध्ये ‘लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपवाला बॉयफ्रेंड सापडल्याचा अंदाज बांधला होता. पण उलगडलेल्या गुपितने ती आता चक्रावून गेली आहे. आपल्यासोबत अशी फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर तरुणीने आता या प्रकरणात सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. 10 वर्षांनंतर रिलेशनशिपमध्ये तिची फसवणूक झाल्याचे आढळून आले. यामुळे तरुणी खूपच अस्वस्थ झाली आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, या ऑनलाइन फसवणुकीची शिकार बनलेल्या महिलेचे नाव किरत अस्सी (42) असे आहे. किरतने स्वीट बॉबी या 6 भागांच्या पॉडकास्ट शोमध्ये तिची ही व्यथा सांगितली. किरत ही लंडनमध्ये रेडिओ डीजे आहे. अशा कृत्यांना गुन्हा घोषित करण्यात यावा, अशी मागणी तिने केली आहे.

किरत 2009 पासून फेसबुकच्या माध्यमातून बॉबी नावाच्या व्यक्तीशी बोलत होती. बॉबीने फेक फोटो टाकून फेक आयडी बनवला होता. फसवणुकीची अधिक माहिती देत ‘संडे टाइम्स’शी बोलताना किरतने सांगितले की, ती ज्या ‘बॉबी’शी बोलत होती ती प्रत्यक्षात तिची बहीण सिमरन भोगल आहे. सिमरन सतत किरतला ऑनलाइन रिलेशनशिपसाठी प्रमोट करत होती.

फसवणूक करणाऱ्या तरुणीचे 50 बनावट ऑनलाईन प्रोफाईल

या प्रकरणातील आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की सिमरन भोगलने अशा प्रकारचे 50 बनावट ऑनलाइन प्रोफाइल तयार केले होते. या माध्यमातून ती वेगवेगळ्या लोकांशी बोलायची. मात्र, दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या संवादात दोघे कधीच भेटले नाहीत. किरतला ऑनलाईन चॅटिंगदरम्यान सिमरन भोगल उर्फ ​​बॉबीने सांगितले की, ती स्वतः ऑस्ट्रेलियात राहते. जेव्हा किरतला या नात्याबद्दल संशय आला, तेव्हा तिने एका खाजगी गुप्तहेराची मदत घेतली. त्यानंतर किरतला या संपूर्ण प्रकरणाची धक्कादायक माहिती मिळाली.

‘माझ्या आयुष्यावर परिणाम झाला’

या फसवणुकीमुळे माझ्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम झाला आहे, असे किरतने सांगितले. ती म्हणाली, ‘माझं आरोग्य, कौटुंबिक, सामाजिक जीवन, रेडिओवरचे काम, करिअर या सगळ्यावर या नात्याचा विपरीत परिणाम झाला आहे.’ ब्रिटनमध्ये अशा प्रकारांबाबत कोणताही कायदा नाही. अशा परिस्थितीत ही छळवणूक ग्राह्य धरून अशा प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनवावी, अशी भावना किरतने व्यक्त केली आहे. (Chatting with sister for 10 years as boyfriend by creating fake account)

इतर बातम्या

Kalicharan: कालीचरण बाबाला पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर, 25 हजारांच्या जातमुचलक्यावर मिळाला जामीन

ISIS Connection : मालवणीतील दोघांना 8 वर्षांचा तुरुंगगवास व दहा हजार दंड; एनआयए कोर्टाचा निकाल

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.