ती कुंवारी नाहीये… त्याने कल्पनाच केली नव्हती; असं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील एका लग्नामुळे सर्वच चक्रावले आहेत. पहिल्या पत्नीचं निधन झालं म्हणून त्याने दुसरं लग्न केलं. त्याला वाटलं आपल्या संसाराचा गाडा सुरू राहील. दोन्ही पोरांना मायेची ममता मिळेल. पण झालं भलतंच...

ती कुंवारी नाहीये... त्याने कल्पनाच केली नव्हती; असं काय घडलं?
marriageImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 7:37 PM

लखनऊ | 18 ऑक्टोबर 2023 : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एक धक्कादायक आणि अजब प्रेम कहाणी समोर आली आहे. अश्निनी कुमार सिंह (52) याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर त्याचं एका महिलेवर प्रेम जडलं. दोघांनी लग्नही केलं. सुखाचा संसार सुरू झाला अन् एक दिवस अचानक त्याला धक्कादायक गोष्ट कळली… आपली पत्नी कुंवाही नाहीये…. ही माहिती मिळताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो तडक पोलीस ठाण्यात गेला. पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण त्याचं तर भावविश्वच हरपून बसलं आहे. काय घडलं असं?

देवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलीपूर मजरे रेंदुआ पल्हरी गावातील ही घटना आहे. या गावात राहणाऱ्या अश्विनी कुमार सिंह याने पोलिसात पत्नीविरोधात तक्रार दिली आहे. पत्नीने फसवणूक केल्याची त्याची तक्रार आहे. सात वर्षापूर्वी त्याची पहिली पत्नी रीता देवी हिचा मृत्यू झाला. पहिल्या पत्नीपासून त्याला राजीव सिंह आणि आदर्श सिंह ही दोन मुले आहेत.

मैत्री झाली अन्

दोन वर्षापूर्वी त्याची भेट फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंडियामऊ येथील आरती देवी (32) हिच्याशी भेट झाली. दोघांमध्ये चांगली मैत्री जमली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपण अविवाहित असल्याचं तिने त्याला सांगितलं. त्यानंतर दोघांनी सहमतीने जयशंकर वेल्फेअर सोसाटीत लग्न केलं. लग्नानंतर दोघेही आपआपल्या घरी राहत होते. म्हणजे एकत्र राहत नव्हते. आरती कधीमधी त्याच्या घरी यायची.

लग्नानंतर भांडू लागली

लग्नाच्या काही दिवसानंतर आरतीचा स्वभाव बदलला. ती थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडायला लागली. मारहाणही करायला लागल्याचा अश्विनीचा आरोप आहे. अनेकदा सांगून पाहिलं. समजावून पाहिलं. पण तिच्या स्वभावात काहीच फरक पडला नाही. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान त्याला आरतीचे दोन दोन लग्न झालेली असल्याचं समजलं आणि त्याचा पाराच चढला.

घटस्फोटाची दोन प्रकरणे कोर्टात

आरतीचं पहिलं लग्न सीतापूरच्या महमूदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नबीगंज येथील मुनेंद्र याच्याशी झालं होतं. लग्नानंतर दोघांमध्ये वाद झाला अन् दोघांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाचं प्रकरण सीतापूरच्या कौटुंबिक न्यायालयात 2012 पर्यंत सुरू होतं. नंतर हे प्रकरण रद्द झालं. त्यानंतर आरतीने 8 मे 2007मध्ये फतेहपूर दक्षिणी नालापार येथील रहिवासी अनीस अहमद याच्याशी लग्न केलं. पण या दोघांच्या घटस्फोटाचं प्रकरणही लखनऊ न्यायालयात सुरू आहे. विशेष म्हणजे या दोन्ही प्रकरणात तिला घटस्फोट मिळालेला नाहीये, असं अश्विनीने सांगितलं.

गुन्हा दाखल

आरतीने दोन्ही लग्नाची गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली. आपण अविवाहित असल्याचं सांगून आपल्याशी विवाह केला. एक प्रकारे माझी फसवणूकच केली आहे, असं अश्विनी याने सांगितलं. या प्रकरणी अश्विनी कुमारच्या तक्रारीनंतर 16 ऑक्टोबर रोजी आरतीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून अधिक चौकशीनंतर पुढील कारवाई करणअयात येणार असल्याचं पोलीस ठाण्याचे एसओ पंकज सिंह यांनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.