Shirdi Fraud : साईबाबा संस्थानच्या भक्त निवासाच्या नावे फेक वेबसाईट, रुम बुकिंगच्या नावाखाली भाविकांची फसवणूक

एका वेबसाईटवर मोबाईल क्रमांक देऊन शिर्डीत द्वारावती भक्त निवासात रूम देतो अशी वल्गना करणाऱ्या एका भामट्याने अनेक भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचं भाविकांच्या तक्रारीनंतर उघडकीस आलं आहे.

Shirdi Fraud : साईबाबा संस्थानच्या भक्त निवासाच्या नावे फेक वेबसाईट, रुम बुकिंगच्या नावाखाली भाविकांची फसवणूक
साईबाबा संस्थानच्या भक्त निवासाच्या नावे फेक वेबसाईटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 5:25 PM

शिर्डी : साईबाबा संस्थान (Saibaba Sansthan)च्या द्वारावती भक्त निवासाच्या नावाने फेक वेबसाईट (Fake Website) तयार करून रूम बुकिंगच्या नावाखाली भाविकांची फसवणूक (Fraud) करत आर्थिक लूट होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका अज्ञाताविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईबाबा संस्थानने भाविकाच्या तक्रारीची दखल घेत आयटी विभागामार्फत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. एका भक्ताच्या तक्रारीवरुन ही फसवणुकीची बाब उघड झाली आहे.

फेक वेबसाईच्या आधारे भक्तांची आर्थिक फसवणूक

एका वेबसाईटवर मोबाईल क्रमांक देऊन शिर्डीत द्वारावती भक्त निवासात रूम देतो अशी वल्गना करणाऱ्या एका भामट्याने अनेक भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचं भाविकांच्या तक्रारीनंतर उघडकीस आलं आहे. मुंबई येथील जय शर्मा या भाविकाने फेक वेबसाईट असलेल्या क्रमाकांवर ऑनलाइन पैसे भरून रूम बुक केली होती. मात्र शिर्डीत प्र‌त्यक्ष आल्यानंतर अशी कोणतीही रूम बुक नसल्याचं भक्तनिवासच्या वतीने सांगितल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं भक्ताच्या लक्षात आलं. त्यानंतर भाविकाने सदर बाब संस्थानच्या निदर्शनास आणून दिली. संस्थान प्रशासनाने भाविकाच्या तक्रारीची दखल घेत आयटी विभागाच्या वतीने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मुंबई महापालिकेत नोकरीला लावतो सांगून सांगलीत दोघांची फसवणूक

मुंबई महापालिकेत नोकरीला लावतो सांगून सांगलीतील विटा येथे दोन तरुणांची सहा लाखे रुपये घेऊन फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सचिन भिंगारदिवे आणि सूरज भस्मे अशी फसवणूक झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश कांबळे आणि कुणाल जाधव अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. आरोपींनी मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरीला लावतो असे सांगत पीडित तरुणांकडून प्रत्येकी 3-3 लाख रुपये घेतले. तसेच त्यांना नियुक्तीचे खोटे पत्र दिले.(Cheating of devotees through fake website in the name of devotee residence of Saibaba Sansthan)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.