बँकेत नवीन खाते उघडताना सावधान, नवीन खाते उघडताच…

एका व्यक्तीने बँकेत खाते उघडले. काही दिवसानंतर त्याच्या बँक खात्यातून लाखो रुपयांची उलाढाल असल्याचे कळले. त्याने बँकेत चौकशी केली असता भयंकर प्रकरण उघडकीस आले.

बँकेत नवीन खाते उघडताना सावधान, नवीन खाते उघडताच...
शेजाऱ्याकडून तरुणीवर अत्याचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 8:17 AM

डोंबिवली : डोंबिवलीत ऑनलाईन फसवणुकीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीच्या बँक खात्यावरील मोबाईल नंबर आणि फोटो बदलून खात्यातून लाखो रुपयांची उलाढाल केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. चांदणी सिंह आणि मोहित लालवाणी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी ऑनलाईन खेळाच्या पैशाचा गैरवापर करण्यासाठी या बँक खात्यांचा वापर करायचे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपींनी आतापर्यंत अशा किती खात्यात अशी फसवणूक केली आहे, याची चौकशी पोलीस करत आहेत.

ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून फसवणूक

डोंबिवलीतील गोळवली गावातील धीरेश रघुनाथ पाटील यांनी आयसीआयसीआय बँकेत नवीन खाते उघडले होते. त्यांच्या नवीन खात्यावरील मोबाईल नंबर आणि फोटो बदलण्यात आला होता. यानंतर ऑनलाईन खेळांच्या माध्यमातून चांदणी सिंह, मोहित लालवाणी नावाच्या दोन आरोपींनी ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून परिसरातील अनेक लोकांची लाखो रुपयांची उलाढाल त्या खात्यांमधून केली.

बँकेत गेल्यानंतर तक्रारदाराला सर्व प्रकार कळताच धक्काच बसला

याप्रकरणी तक्रारदार धीरेश पाटील यांना हा प्रकार समजताच त्यांनी बँकेतून या प्रकाराची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना आपल्या आणि इतरांच्या खात्यांमधून अशाप्रकारे लाखो रुपयांची हेराफेरी झाल्याचे समजले. त्यानंतर धीरेश यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, बँक खात्यावरील तपशील बदलून पैसे वळते करण्याच्या कामात बँकेतील कोणत्या कर्मचाऱ्याचा सहभाग आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.