देशात आजपासून ३ नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत. हे तीन नवे कायदे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियमन आहे. संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यामध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. जुन्या भारतीय दंड संहितामध्ये 511 कलम होती मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेत 358 कलमे आहेत. आता फसवणुकीसाठी आता कलम 420 नाही तर 316 कलम वापरले जाणार आहे. खुनासाठी कलम 302 ऐवजी आता 101 वापरले जाणार आहेत. नवीन कायद्यानुसार छत्रपती संभाजीनगर शहरात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. संभाजीनगर शहरातील एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तसेच देशात पहिला गुन्हा नवी दिल्लीत दाखल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात बलात्कार प्रकरणात कलम 64 नुसार राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
आधीच्या 376 ऐवजी कलम 64 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात डिसेंबर 2023 मध्ये संसदेने या नव्या कायद्यांना मंजुरी दिली होती. सरकारने मंजूर केलेले या कायद्यांना देशभरात अनेक राजकीय पक्षांसह वकील आणि इतर संघटनांनी मोठा विरोध केला होता. नव्याने तयार करण्यात आलेल्या या कायद्यांमध्ये अनेक कठोर शिक्षा असून त्यामुळे गुन्हेगारांवर चाप बसेल, असा दावा सरकारकडून करण्यात आला होता. तसेच नवीन कायद्यामुळे न्यायालयीन व्यवस्थेत बदलांसह तांत्रिक बदल केले आहे.
नवीन कायद्यांना विरोधकांकडून विरोध करण्यात आला. हे कायदे घाई घाईत मंजूर करून लागू केल्याचा आरोप विरोधकांनी केला.
Delhi: First FIR u/s of Bharatiya Nyaya Sanhita, 2023 registered at Kamla Market PS in Delhi. Case registered against a street vendor u/s 285 of Bharatiya Nyaya Sanhita for obstruction under foot over bridge of New Delhi Railway Station and making sales.
— ANI (@ANI) July 1, 2024
नवीन कायद्यानुसार राज्यातील पहिला गुन्हा छत्रपती संभाजीनगरात दाखल झाला. देशात हा गुन्हा नवी दिल्लीत दाखल झाला. दिल्लीत रेल्वे स्टेशनवर पुलाखाली अवैध पद्धतीने विक्री करणाऱ्या वेंडरवर गुन्हा दाखल करण्यात आला.