26 कोटींची खंडणी मागितली; गँगस्टर छोटा राजनला दोन वर्षाची शिक्षा
तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Chhota Rajan gets 2-year jail term in 26 crore extrusion case)
मुंबई: तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. (Chhota Rajan gets 2-year jail term in 26 crore extrusion case)
गँगस्टर छोटा राजन याला आज आणखी एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. पनवेल येथील एक बिल्डर नंदू वाजेकर यांनी पुण्यात एक जागा डेव्हलपमेंट करण्यासाठी घेतली होती. ही जागा वाजेकर याला परमानंद ठक्कर या एजंट ने दिली होती. या बदल्यात वाजेकर याने परमानंद याला दोन कोटी रुपये दिले होते. मात्र, यानंतर ही आपला व्यवहार पूर्ण झाला नसल्याचं कारण पुढे करत परमानंद याने पैसे मागायला सुरुवात केली होती. जास्त पैसे मिळावे म्हणून परमानंद ठक्कर याने या व्यवहारात गँगस्टर छोटा राजन याला मध्यस्थी करायला सांगितली होती. त्यामुळे छोटा राजन याने बिल्डर वाजेकर याला फोन करून धमकावलं होत आणि प्रकरण मिटवायला सांगितलं होतं. यामुळे अखेर वाजेकर याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. 2015 सालातील हे प्रकरण आहे, अंस सीबीआयचे विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सांगितलं.
या प्रकरणात छोटा राजन सोबत त्याच्या इतर तीन साथीदारांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजन याच्यासह सुरेश शिंदे, सुमित म्हात्रे आणि अशोक निकम यांनाही दोन वर्षे शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड अशी ही शिक्षा सुनावली आहे. पाच हजार रुपये न भरल्यास त्याबदल्यात सश्रम कारावासात वाढ होणार आहे.
71 खटले प्रलंबित
या प्रकरणात मोक्का कायदा आणि खंडणीसाठी धमकावणे, ट्रेस पासिंग बाबत कलम लावण्यात आली होती. मात्र, राजन याच्या विरोधात मोक्का अॅक्ट सिद्ध झाला नाही. केवळ खंडणीच्या उद्देशाने धमकावणे हेच सिद्ध झाल्याने त्याला दोन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजन याच्या विरोधात सुमारे 71 खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी आतापर्यंत चार गुन्ह्यांचा निकाल लागला आहे आणि या चारही गुन्ह्यात छोटा राजन याला दोषी ठरवून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजन याला आतापर्यंत सुनावण्यात आलेल्या शिक्षा अशा आहेत…
1) पत्रकार जे. डे. प्रकरण – जन्मठेप 2) दिल्ली एथिक बोगस पासपोर्ट प्रकरण – दोन वर्षे 3) बी. आर. शेट्टी फायरिंग केस – 10 वर्ष शिक्षा 4) बिल्डर वाजेकर खंडणी केस- दोन वर्षे शिक्षा. (Chhota Rajan gets 2-year jail term in 26 crore extrusion case)
VIDEO | 36 जिल्हे 72 बातम्या | 4 January 2021 https://t.co/6t6g7yLCO2 @CMOMaharashtra #maharashtra #TopNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2021
संबंधित बातम्या:
मुंबईतील ड्रग्ज रॅकेटचं टॉलिवूडशी कनेक्शन?, वांद्रे, मिरारोडमध्ये छापेमारी; अभिनेत्रीला अटक
3 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार? विव्हळत शेतात सापडली
(Chhota Rajan gets 2-year jail term in 26 crore extrusion case)