Exclusive Video | चिकन विक्रेत्यावर बाईकस्वारांचा गोळीबार, सीसीटीव्ही फूटेज समोर

पालघर (Palghar) शहरातील ओवेज चिकन सेंटरचे मालक जावेद लुलानीया यांच्यावर त्यांच्याच दुकानासमोर गोळीबार (Firing) करण्यात आला होता. अज्ञात हल्लेखोरांकडून हा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये या गोळीबारात लुलानिया हे जखमी झाले होते. आता याच घटनेचं सीसीटीव्ही फुटेज 'टीव्ही-9 मराठी'च्या हाती लागलं आहे. पोलीस सध्या या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

Exclusive Video | चिकन विक्रेत्यावर बाईकस्वारांचा गोळीबार, सीसीटीव्ही फूटेज समोर
Palghar Firing CCTV Footage
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 10:32 AM

पालघर : पालघर (Palghar) शहरातील ओवेज चिकन सेंटरचे मालक जावेद लुलानीया यांच्यावर त्यांच्याच दुकानासमोर गोळीबार (Firing) करण्यात आला होता. अज्ञात हल्लेखोरांकडून हा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये या गोळीबारात लुलानिया हे जखमी झाले होते. आता याच घटनेचं सीसीटीव्ही फुटेज ‘टीव्ही-9 मराठी’च्या हाती लागलं आहे. पोलीस सध्या या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

गोळीबार करुन हल्लेखोर फरार

पालघरमधील नजर अली चाळ परिसरात ही घटना घडली होती. याच परिसरामध्ये जावेद लुलानिया यांचे ओवेज चिकन सेंटर हे दुकान आहे. दुकानासमोरच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. दोन हल्लेखोर बाईकवर आले होते, त्यांनी लुलानिया यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर ते घटनास्थळावरुन पसार झाले होते. मंगळवारी (16 नोव्हेंबर) रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली होती.

दरम्यान, गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली.

पाहा एक्स्लुझिव्ह व्हिडीओ – 

सीसीटीव्ही फुटेज ‘टीव्ही-9 मराठी’च्या हाती

गोळीबार करणारे दोन्ही आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज ‘टीव्ही-9 मराठी’च्या हाती लागलं आहे. त्यात दोन आरोपी मोटर सायकलवर बसून जावेद लुलानीया यांच्यावर गोळी घालून पसार झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. हा हल्ला का करण्यात आला? हल्लेखोर कोण होते याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

57 वर्षीय प्रियकराचा खून

57 वर्षीय प्रियकराचा खून केल्या प्रकरणी मुंबईत 70 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. बुधवारी वडाळ्यातील त्यांच्या राहत्या घरात हे हत्याकांड घडले होते. रागाच्या भरात हातोड्याने वार करुन वृद्धेने प्रियकराचा खून केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

70 वर्षीय शांती पाल आणि 57 वर्षीय बिमल खन्ना यांचे प्रेमसंबंध होते. मात्र शांती पाल यांच्या पहिल्या विवाहातून झालेल्या मुलीशी बिमल खन्ना याने लग्ना केल्यामुळे शांती यांचा संताप झाला होता. खन्नाने आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, या भावनेतून शांती पाल यांच्या संतापाचा पारा चढला होता.

संबंधित बातम्या :

ज्या ट्रकवर उदरनिर्वाह त्यालाच लटकलेला मृतदेह, हिंगोलीत ट्रकचालकाची आत्महत्या

धक्कादायक! पुण्यात तेराव्या मजल्यावरून वेटरने मारली उडी; आत्महत्येपूर्वी केले फेसबूक लाईव्ह

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.