अहमदनगर : देशात बालविवाह करणं हा गुन्हा आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा सर्रासपणे केला जात असल्याचं अनेकदा उघड झालं आहे. अशा लोकांवर अनेकदा कारवाई देखील करण्यात आली आहे. पण तरीही काही जण सुधारताना दिसत नाहीत. अहमदनगरमध्ये अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. आई-वडिलांनीच एका 14 वर्षीय मुलीचं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या निदर्शनास ही बाब आली. डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
नगर तालुक्यातील एका गावात 2020 साली अल्पवयीन मुलीचे तिच्याच आई-वडिलांनी लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच तिला गर्भधारणा झाली. त्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यांनतर डॉक्टरांनी सर्व प्रकार MIDC पोलिसांना सांगितला. दरम्यान या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात मुलीचे आई-वडील, पती आणि सासू-सासरे यांच्याविरोधात अत्याचार, पोस्को आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :
मोहिते-साठे गटात तुफान राडा, धारधार शस्त्राने भर दिवसा तिघांचा खून, सांगलीमध्ये खळबळ
पोक्सो अंतर्गत गुन्हा, महिन्याभरात कारागृहात आत्महत्या, भर पहाटे कैद्याने स्वत:ला का संपवलं?