शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर नाशिकमध्ये चॉपरने हल्ला; जखमींची प्रकृती चिंताजनक

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर चॉपरने हल्ला केल्याची खळबळजनक घटना रविवारी अशोकनगर परिसरातील जाधव संकुल भागात घडली आहे.

शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर नाशिकमध्ये चॉपरने हल्ला; जखमींची प्रकृती चिंताजनक
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 12:09 PM

नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर चॉपरने हल्ला केल्याची खळबळजनक घटना रविवारी अशोकनगर परिसरातील जाधव संकुल भागात घडली आहे. गंभीर जखमी असलेल्या तिघांचीही प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. बहुचर्चित अशा आंनदवल्ली खून प्रकरणाचा नुकताच उलगडा झाला. याप्रकरणी तब्बल 20 जणांना तुरुंगाची हवा खावी लागतेय. त्यात बिल्डरांपासून ते दोन कुख्यात गुंडांचाही समावेश आहे. त्यानंतर झालेल्या परप्रांतीय कामगाराचा झालेला खून. याप्रकरणीही पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. आता त्याच नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना पदाधिकारी श्याम फर्नांडिस हे दोघा भावांचे वाद सोडवण्यासाठी गेले होते. तेव्हा संशयित संतोष ढमाळ याने फर्नांडीस यांच्यासह सागर जाधव आणि राजू उगले यांच्यावर चॉपरने हल्ला केला. त्यात फर्नांडीस यांच्यासह तिघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशोकनगर परिसरातील जाधव संकुल भागात ही घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये संशयित संतोष ढमाळवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दोघा भावांचे वाद सोडवण्यास गेल्यावरून अंतर्गत वादातून हा प्रकार घडला असल्याचे समजते. पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एका राजकीय पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ आहे. वातावरण खराब चिघळू नये याची दक्षता घेणे पोलिसांनी सुरू केले आहे.

महिलेचा निर्घृण खून कबीरनगरमध्ये आणखी एका महिलेचा अतिशय निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. पूजा आंबेकर असे मृत महिलेचे नाव आहे. पूजावर तिच्यासोबत राहणाऱ्या इसमाने एकदोन नव्हे, तर चक्क जवळपास 25 चाकूचे वार केले आहेत. रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज आहे. संशयित संतोष आंबेकर फरार असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे आंबेकरवर पूर्वीही दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तो अट्टल गुन्हेगार असल्याचे समजते. (Chopper attacks three including Shiv Sena office bearers in Nashik; The condition of the injured is critical, treatment is underway)

इतर बातम्याः

महाराष्ट्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावा; नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी

100 टक्के लसीकरणासाठी 30 नोव्हेंबरची डेडलाईन; नाशिक विभागातल्या मोहिमेला पुन्हा गती!

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.