Video : नागरिकाच्या सतर्कतेमुळे उधळला चोरीचा डाव, घटना सीसीटीव्हीत कैद
वाशिम जिल्ह्यात (Washim District) दिवसेंदिवस चोरीच्या (Theft) घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. मात्र यावेळी नागरिकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला आहे. ही घटना सीसीटीव्ही (cctv) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
वाशिम : वाशिम जिल्ह्यात (Washim District) दिवसेंदिवस चोरीच्या (Theft) घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. मात्र यावेळी नागरिकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला आहे. ही घटना सीसीटीव्ही (cctv) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जिल्ह्यातील मानोरा शहरातून हा प्रकार समोर आला आहे. रात्री साडेतीन वाजता एका चारचाकीमधून चोरटे चोरीच्या उद्देशाने खाली उतरले. मात्र या परिसरात राहणारे नागरिक राम हेडा यांना संबंधित व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने चोरट्यांचा डाव फसला आणि त्यांना पळ काढाला लागला. ही सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता संबंधित चोरट्यांचा शोध घेत आहेत.
…आणि चोरीचा बेत फसला
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रात्री साडेतीन वाजता मानोरा शहरात चोरीच्या उद्देशाने काही व्यक्ती आपल्या चारचाकी वाहनातून खाली उतरले. मात्र याच परिसरात राहणाऱ्या राम हेडा यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांना संबंधित व्यक्तींच्या हालचारी संशयास्पद वाटल्या, त्यांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना कळवली. चोरट्यांनी याच परिसरात असलेल्या कृष्णा ट्रेडर नावाच्या दुकानाचा सीसीटीव्ही कॅमेरा फोडून दुकानात प्रवेश केला. मात्र पोलिसांना माहिती मिळाल्यामुळे त्यांचा चोरीचा बेत फसला आणि आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांकडून तपासाला सुरुवात
दरम्यान आता पोलिसांकडून या घटनेच्या तपासाला सुरुवात झाली आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, हे चोरटे नेमके कोण होते? त्यांनी वापरलेल्या गाडीचा नंबर काय होता याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहरात चोरीच्या घटना वाढत असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी आता नागरिकांमधून करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
Sangli | ऊसाच्या शेतात गांजाची लागवड, सांगलीत 25 किलोंचा गांजा आढळला
Osmanabad | तुळजाभवानी मंदिरात पूजाऱ्यांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण, नारळ-वीटांनी मारलं
Latur : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा आत्महत्येचा प्रयत्न, मैत्रिणींमुळे वाचला जीव