जळगावात महाराष्ट्र बंदला गालबोट, महाविकास आघाडी आणि भाजपचा गट आमनेसामने, प्रचंड गदारोळ

महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आजचा एक दिवस महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्यातील अनेक भागातील व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दिली. पण भुसावळ तालुक्यातील वरणगावात या बंदला गालबोट लागलं आहे.

जळगावात महाराष्ट्र बंदला गालबोट, महाविकास आघाडी आणि भाजपचा गट आमनेसामने, प्रचंड गदारोळ
जळगावात महाराष्ट्र बंदला गालबोट, महाविकास आघाडी आणि भाजपचा गट आमनेसामने, प्रचंड गदारोळ
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 6:11 PM

भुसावळ (जळगाव) : महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आजचा एक दिवस महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्यातील अनेक भागातील व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दिली. पण भुसावळ तालुक्यातील वरणगावात या बंदला गालबोट लागलं आहे. वरणगावमध्ये दुकानं बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचे आणि भाजपचे कार्यकर्ते थेट आमनेसामने आले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते दुकानं बंद करण्याचं आवाहन करत होते. तर भाजपचे पदाधिकारी दुकानं उघडण्याचं आवाहन करत होते. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर थेट हाणामारीत झालं.

भाजपचे माजी नगराध्यक्ष जखमी

संबंधित घटना ही वरणगाव बस स्टँड चौकात घडली. यावेळी दुकाने उघडण्यासाठी भाजपचा गट आला असता मोठा गदारोळ झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. बराच वेळ परिसरात दहशतीचं वातावरण होतं. पण पोलिसांनी मध्यस्ती केल्याने मोठा गदारोळ टाळता आला.

नेमकं काय घडलं?

वरणगावात आज राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी गटाने परिसरात फिरत होते. ते दुकानदारांना दुकानं बंद करण्याचं सांगत महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत होते. विशेष म्हणजे या गटाने वरणगाव पोलीस ठाण्यात त्याबाबत कळवले होते. तसेच व्यापाऱ्यांनादेखील बंद पाळण्याचं आवाहन केलं होतं. तरीही काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केलं नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. ते व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्याचं आवाहन करत होते.

दरम्यान, याचवेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष यांचा गट सुद्धा याच रस्त्याने फिरुन दुकाने उघडण्याचं आवाहन करत होता. यावेळी व्यापारी नेमकं कुणाचं ऐकावं या विचाराने संभ्रमात पडले. याचवेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा गट आणि भाजपचा गट आमनेसामने आले. दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरु होत्या. एक गट बंदची हाक देत होता. तर दुसरा गट बंदला विरोध करण्याची घोषणा करत होता. त्यामुळे दोन्ही गटात तुफान शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. या गदारोळात भाजपचे सुनील काळे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

या घटनेमुळे वरणगावात खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगरचे पोलीस उपअधिक्षक तसेच वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कुमार अडसूळ आणि दंगा नियंत्रण पथकाने गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं आहे. वरणगावमध्ये अनेक दिवसांपासून राजकीय धुसफूस सुरु आहे. त्याचं खुलेआम दर्शन आज बघायला मिळालं.

हेही वाचा :

रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट, बंद पाळून नागरिकांची भाजपला सणसणीत चपराक : नाना पटोले

‘आघाडी सरकारला लखीमपूरच्या शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम, लातूरच्या आंदोलक शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष’

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.