जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जमिन मालक, दुकान मालक, घर मालक या तिघांमध्ये तुफान राडा झाला. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 8:01 PM

विरार / विजय गायकवाड (प्रतिनिधी) : जमिनीच्या वादातून विरारमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. जमिन मालक, दुकान मालक, घर मालक या तिघांमध्ये तुफान राडा झाला. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारच्या नारंगी पाडा परिसरात गुरुवार दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. विरार पोलिसांनी सध्या तरी कोणालाही ताब्यात घेतले नसून, सर्वांना नोटीस बजावल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महापालिकेकडून इमारत डिमोलेशन केल्यानंतर राडा

वसई विरार महापालिकेने इमारतीचे डिमोलेशन केल्यानंतर जमिन मालक आणि इमारतीमधील दुकानं आणि रूम मालक यांच्यात ही हाणामारी झाली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

तुंबळ हाणामारीत दोन्ही गटातील लोक जखमी

दगड, लाठी, काठ्यांनी ही तुंबळ हाणामारी झाली आहे. यात दोन्ही गटातील लोकांना हाताला, पायला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. जमिन मालक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये ही हाणामारी झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

हे सुद्धा वाचा

कल्याणमध्ये रहिवासी आणि बिल्डरमध्ये हाणामारी

कल्याण पूर्वेकडील तिसगाव येथील साई साक्षी इमारतीमधील रहिवाशांचा आणि बिल्डरचा इमारतीच्या वॉल कंपाऊंडवरून वाद सुरू आहे. याच वादातून सोसायटी सदस्यांनी वॉल कंपाऊंड दुरुस्त करण्यासाठी माती आणून टाकली होती.

यामुळे सोसायटीचे सदस्य आणि संबंधित बिल्डरच्या साथीदारांमध्ये वाद झाला. या वादातून संबंधित बिल्डरच्या लोकांनी या ठिकाणी गोंधळ घालत सोसायटीचे सदस्यांना मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात रहिवाशांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.