दिल्लीत दोन पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यातच भिडले, ‘या’ कारणामुळे जखमी होईपर्यंत एकमेकांना हाणले
गोविंदपुरी पोलिस स्टेशनचे एसएचओ जगदीश यादव आणि एसआय महेश चंद यांच्यात भांडण झाले होते. उच्च न्यायालयाच्या एका एसआरच्या कागदपत्रांवर सह्या करण्यावरून हा वाद सुरू झाला. नंतर या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले.
दिल्ली : क्षुल्लक कारणा (Minor Dispute)वरुन गोविंदपुरी पोलीस ठाण्यात एसएचओ आणि एसआय यांच्यात लाथा-बुक्की मारत जोरदार हाणामारी (Fighting) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस ठाण्यात आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची हाणामारी पाहून इतर पोलीस कर्मचारीही चक्रावून गेले. पोलिसांनी दोघांना कसेतरी वेगळे करत शांत केले. त्यानंतर वरिष्ठांना याची माहिती देण्यात आली. या हाणामारीत एसएचओ आणि एसआय दोघेही जखमी (Injured) झाले आहेत. या घटनेनंतर एम्समध्ये दोघांचेही एमएलसीही करण्यात आले.
एका कागदपत्रावरुन सुरु झाला वाद
गोविंदपुरी पोलिस स्टेशनचे एसएचओ जगदीश यादव आणि एसआय महेश चंद यांच्यात भांडण झाले होते. उच्च न्यायालयाच्या एका एसआरच्या कागदपत्रांवर सह्या करण्यावरून हा वाद सुरू झाला. नंतर या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. या प्रकरणात, संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच आदेशभंगाच्या आरोपाखाली एसआय महेश चंद यांना निलंबित करण्यात आले आहे.
कागदपत्रात दुरुस्ती सांगितल्याने वाद
एसआय महेश हे 2010 च्या बॅचचे उपनिरीक्षक आहेत. उच्च न्यायालयाच्या एसआरची स्वाक्षरी घेण्यासाठी ते एसएचओ जगदीश यादव यांच्याकडे गेले होते. SHO यांनी सही करण्यापूर्वी त्यात काही दुरुस्त्या केल्या, तीच गोष्ट SI महेशला आवडली नाही.
हाणामारीत दोघेही पोलीस अधिकारी जखमी
एसआयने सांगितले की, त्याने आधीच स्थायी वकिलांकडून एसआरची तपासणी केली होती, परंतु एसएचओ मुद्दाम दुरुस्तीचे काम सांगून त्याचा आणि माझा वेळ वाया घालवत आहे. यावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये दोन्ही पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.
आज्ञाभंग केल्याप्रकरणी एसआय निलंबित
डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितले की, 6 सप्टेंबर रोजी गोविंदपुरी पोलिस स्टेशनच्या आवारात एसएचओ जगदीश आणि एसआय महेश चंद यांच्यात बाचाबाची आणि मारहाण झाल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी SI महेश चंद यांना आज्ञाभंग केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात येत आहे.