दाम्पत्याने बिल्डरकडून आठ कोटी उकळले, अटक केल्यानंतर आरोपी महिलेचं तांडव

पोलिसांनी डोंबिवलीहून पती-पत्नीला ताब्यात घेतलं. यावेळी आरोपी महिलेने प्रचंड तांडव आणि आरडाओरडा केला (couple threatened the builder and took 8 crore rupees in dombivli).

दाम्पत्याने बिल्डरकडून आठ कोटी उकळले, अटक केल्यानंतर आरोपी महिलेचं तांडव
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 7:24 PM

ठाणे : डोंबिवलीतील एका दाम्पत्याने बिल्डरकडून आठ कोटी उकळले. याप्रकरणी संबंधित बिल्डरने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलीस दाम्पत्याला पकडण्यासाठी त्यांच्या घरी गेली तेव्हा त्यांनी आधी दार उघडले नाही. पोलिसांनी अनेक तास दरवाजा ठोठावला. काही तासांनी अखेर पोलिसांनी वैतागून दरवाजा तोडला. तेव्हा आरोपी महिला पतीसह देवपूजेत लीन होती. अखेर पोलिसांनी डोंबिवलीहून पती-पत्नीला ताब्यात घेतलं. यावेळी आरोपी महिलेने प्रचंड तांडव आणि आरडाओरडा केला (couple threatened the builder and took 8 crore rupees in dombivli).

डोंबिवली पूर्वेतील नांदीवली परिसरात वर्गीस म्हात्रे आणि आर्यन सिंग या बिल्डरांना ब्लॅकमेल करुन आठ कोटी रुपये उकळले गेले. अखेर या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मानपाडा पोलिसांनी विद्या म्हात्रे तिचे पती विश्वनाथ म्हात्रे या दोघांसह सुनील म्हात्रे आणि एकनाथ म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. या दरम्यान चारही आरोपींनी अटक पूर्व जामीनासाठी कल्याण कोर्टात धाव घेतली. न्यायालयात हे प्रकरण सुरु आहे.

आरोपी महिला विद्या म्हात्रे आणि तिचा पती विश्वनाथ म्हात्रे यांना अटक करण्यासाठी पोलीस डोंबिवली पूर्व येथील बालाजी कृपा सोसायटीत पोहोचले तेव्हा पोलिसांना विचित्र अनुभव आला. पोलीस अधिकारी एस.ए सिमटे आणि त्यांच्या पथकाने आरोपींचे दार ठोठावले. जवळपास तीन तास आरोपी पती-पत्नीने दार उघडले नाही. अखेर विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय साबडे हे घटनास्थळी पोहोचले.

आरोपी दार उघडत नसल्याने पोलिसांनी दार तोडण्याचा निर्णय घेतला. दार तोडल्यानंतर पोलीस आत शिरले. तेव्हा त्यांनी पाहिले की, आरोपी पती-पत्नी भटजीसोबत देवपूजा करत होते. देवपूजेसाठी तिने पोलिसांना तब्बल चार तास ताटकळत ठेवले. अखेर सहा तासांनंतर पोलिसांनी विद्या म्हात्रे, तिचा पती विश्वजीत म्हात्रे याना ताब्यात घेतले. मात्र या दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची प्रचंड दमछाक झाली आहे (couple threatened the builder and took 8 crore rupees in dombivli).

हेही वाचा : आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या, मुंबईतील धारावी हादरली

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.