बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, 19 वर्षीय नराधमाकडून पाच वर्षीय चुलत बहिणीवर बलात्कार

मुली आज खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय (Cousin brother rapes five year old minor girl).

बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, 19 वर्षीय नराधमाकडून पाच वर्षीय चुलत बहिणीवर बलात्कार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 6:03 PM

पाटणा : मुली आज खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. बिहारमध्ये तर बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. एका 19 वर्षीय नराधमाने अवघ्या पाच वर्षीय चुलत बहिणीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच संपूर्ण बिहारमध्ये आरोपी विरोधात संताप व्यक्त केला जातोय. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. तर पीडित चिमुकलीच्या आई-वडिलांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती पोलिसांकडे केली (Cousin brother rapes five year old minor girl).

नेमका विश्वास कोणत्या नात्यावर ठेवावा? पीडितेच्या आई-वडिलांचा सवाल

संबंधित घटना ही बिहारच्या दरभंगा येथील हनुमाननगर परिसरातील आहे. या परिसरात पीडित कुटुंब हे त्यांच्या एका नातेवाईकांच्या लग्नासाठी आले होते. लग्नाची जय्यत तयारी सुरु होती. पीडित कुटुंबाचे नातेवाईक ज्या ठिकाणी राहतात अगदी त्यांच्या शेजारीच आरोपी राहतो. आरोपी हा पीडित तरुणीचा नात्याने चुलत भाऊ होता. मात्र, चुलत भावानेच अशा प्रकारचं संतापजनक आणि किळसवाणं कृत्य केल्याने नेमका विश्वास कोणत्या नात्यावर ठेवावा? असा सवाल पीडितेच्या आई-वडिलांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित कुटुंब लग्नाच्या निमित्ताने दरभंगाला आले होते. मंडपात मुलगी खेळत होती. यावेळी आरोपीने तिला खाऊ घेऊन देतो सांगत कडेवर उचललं. त्यानंतर तिला शेतात नेलं. तिथे त्याने पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित चिमुकलीने आपल्या आईला सगळा प्रकार सांगितला. या घटनेची माहिती मिळताच चिमुकलीच्या आईने संतापात आरडाओरड केली. तिने इतर नातेवाईकांना आणि तिच्या पतीला संबंधित घटना सांगितली. त्यानंतर आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

पोलिसांकडून तक्रारीची गांभिर्याने दखल

पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता त्यांनी तातडीने घटनेची दखल घेतली. त्यांनी आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या. त्याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पीडित चिमुकलीची मेडिकल तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात लवकरच कठोर कारवाई होण्याती शक्यता आहे.

पीडितेच्या आई-वडिलांकडून रोष व्यक्त

आमच्या कुटुंबासाठी हा फार वाईट, विचित्र आणि भयानक क्षण आहे. आमचा तर आता सर्वच नात्यांवरील विश्वास उडाला आहे, अशा शब्दात पीडितेच्या आई-वडिलांनी रोष व्यक्त केला (Cousin brother rapes five year old minor girl).

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.