Beed: काम करत नाही म्हणून वेटरला हॉटेलमालकाची बेदम मारहाण, पुरावा लपवण्यासाठी मृतदेह दरीत फेकला!

सततचे दारू पिणे आणि काम न करणे या कारणांमुळे हॉटेलमालकाने वेटरला बेदम मारहाण केली. यात वेटरचा मृत्यू झाला. घटनेतील पुरावे नष्ट करण्यासाठी हॉटेलमालकाने त्याचा मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना बीडमधील पाटोदा तालुक्यात सोमवारी उघडकीस आली.

Beed: काम करत नाही म्हणून वेटरला हॉटेलमालकाची बेदम मारहाण, पुरावा लपवण्यासाठी मृतदेह दरीत फेकला!
हॉटेल मालकाने मारहाण केल्याने 44 वर्षीय वेटरचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 1:55 PM

बीड (पाटोदा): महिनाभरापूर्वीच हॉटेलमध्ये कामाला लागलेला वेटर काम करत नाही आणि सतत दारू पीत असतो, याचा राग येऊन हॉटेल मालकाने त्याला बेदम मारहाण केली. यात वेटरचा मृत्यू (Murder case in Beed) झाला. हा प्रकार लपवण्यासाठी हॉटेल मालकाने वेटरचा मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. वेटरच्या मुलाने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आला.

वेटरच्या खिशातील फोन नंबरवरून तपास

या प्रकरणी वेटर बबन भाऊसाहेब कुलट यांचा मुलगा रोहित कुलट याने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, वडील बबन कुलट यांना दारू पिण्याची सवय होती. ते नगर जिल्ह्यातील खडकवाडी येथील रहिवासी होते. पण काम मिळेल त्या ठिकाणी हे कुटुंब रहायला जात होते. महिनाभरापूर्वी ते पाचंग्री येथील हॉटेल मालक अंगद मुंडे यांच्याकडे कामाला लागले. मात्र सतत दारू पीणे आणि काम न करणे, यावरून हॉटेल मालकाने त्यांना सोमवारी प्रचंड मारहाण केली. अंगद मुंडे यांनी त्यांना काठीने मारल्याने बबन यांचा मृत्यू झाला. या खूनाचा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून हॉटेल मालकाने त्यांचा मृतदेह भायाळा ते कचरवाडीदरम्यान दरीत फेकून दिला.

मुलाने तक्रार दिल्यावर प्रकार उघड

सोमवारी बबनचा मृतदेह परिसरातील काही गुराख्यांना आढळून आला. त्यांनी पाटोदा पोलिसांना याविषयी माहिती दिली. दरम्यान बबन यांच्या मुलाने हॉटेल मालकाला चौकशी केली असता, तो रविवारीच हॉटेलमधून निघून गेल्याचे सांगण्यात आले. मात्र ही माहिती बबन यांच्या पत्नीने पोलिसांना फोन करून सांगितली. बबन यांच्या मृतदेहावरील जखमांवरून त्यांना मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या खिशात सापडलेल्या फोन नंबरवर फोन केल्यानंतर पोलिसांना या खूनाची दिशा मिळत गेली. या प्रकरणी हॉटेल मालकाला ताब्यात घेतले असून यात अजूनही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ST WORKER STRIKE : ST कर्मचाऱ्यांचा आजचा मुक्कामही आझाद मैदानातच, संपाबाबत उद्या 11 वाजता निर्णय-खोत

VIDEO: विलीनीकरण ते ऐतिहासिक पगारवाढ… अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.