Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मामी-भाच्याच्या अनैतिक संबंधांची मामाला कुणकुण, लोखंडी दांडक्याने डोकं चिरडून हत्या

40 वर्षीय सपन कुमार साहू पंजाबच्या लुधियाना शहरातील जागिरपूर रोड परिसरातील राज एन्क्लेव्ह इमारतीतील राहत्या घरी रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला होता. झोपेतच डोक्यावर अवजड वस्तूने वार केल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली होती

मामी-भाच्याच्या अनैतिक संबंधांची मामाला कुणकुण, लोखंडी दांडक्याने डोकं चिरडून हत्या
मामी-भाच्याचे प्रेमसंबंध, मामाकडून तरुणाची हत्या
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 9:17 AM

चंदिगढ : मामीसोबतच्या अनैतिक संबंधातून भाच्याला प्राण गमवावे लागल्याची घटना पंजाबमध्ये उघडकीस आली आहे. मामाला आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची कुणकुण लागली. त्यामुळे त्याने आपल्या 40 वर्षीय भाच्याची लोखंडी दांडक्याने डोकं चिरडून हत्या केली.

नेमकं काय घडलं?

40 वर्षीय सपन कुमार साहू पंजाबच्या लुधियाना शहरातील जागिरपूर रोड परिसरातील राज एन्क्लेव्ह इमारतीतील राहत्या घरी रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला होता. झोपेतच डोक्यावर अवजड वस्तूने वार केल्यामुळे त्याची हत्या झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत होतं. सपन फोन उचलत नसल्यामुळे त्याचा मालक सिद्धू कुमार चौकशी करायला घरी गेला. तेव्हा घरी तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं आणि हा प्रकार उघडकीस आला. मात्र घरात शिरलेल्या चोरांनी भाच्याची हत्या केल्याचा बनाव मामाने रचला होता.

सपनच्या मालकाने काय पाहिलं?

सपन कुमार साहू विटांच्या कंपनीमध्ये कंत्राटदार म्हणून काम करत होता. “रविवारी सकाळी मी त्याला एका कंत्राटाबद्दल विचारण्यासाठी फोन केला, मात्र समोरुन काहीच उत्तर आलं नाही. मी त्याच्या घरी गेलो, तेव्हा त्याच्या मामाने घराचा दरवाजा उघडला. आम्ही दोघं त्याच्या खोलीत गेलो, तेव्हा तो तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचं डोकं चिरडण्यात आलं होतं.” असं मालक सिद्धू कुमारने पोलिसांना सांगितलं.

सपनचा मामा सर्वन कुमार साह सुरुवातीपासूनच या प्रकरणातील प्रमुख संशयित होता. चौकशीदरम्यान त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन मामाला अटक केली.

मामा जेलमध्ये, मामी-भाच्याचे प्रेमसंबंध

ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी सर्वन कुमार साह याला तुरुंगवास झाला होता. मार्च महिन्यात तो जामिनावर सुटून आला होता. दरम्यानच्या काळात त्याच्याच घरात राहणाऱ्या भाच्याचे म्हणजेच सपनचे आपल्या मामीसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले होते. 14 ऑगस्टच्या रात्री सपन झोपायच्या तयारीत असताना सर्वनने त्याच्या डोक्यात लोखंडी दांडक्याने प्रहार केला. मात्र चोरांनी घरात शिरुन भाच्याची हत्या केल्याचा बनाव त्याने रचला होता.

संबंधित बातम्या :

जबर मारहाणीत पत्नीचा मृत्यू, 28 वर्षीय पतीचा अंगणातील झाडाला गळफास

अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन अश्‍लील चिठ्ठी पाठवली, कोल्हापुरात तिघांना अटक

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.