500 CCTV कॅमेरे, 800 तासांचे चित्रीकरण, 200 जणांची चौकशी, न घडलेल्या बलात्काराचं सत्य ‘असं’ समोर

गांधी हॉस्पिटल आणि संतोष नगर भागात झालेल्या दोन बलात्कारांच्या प्रकरणाचा तपास हैदरबाद पोलीस करत होते. प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांची अनेक पथकं कामाला लागली.

500 CCTV कॅमेरे, 800 तासांचे चित्रीकरण, 200 जणांची चौकशी, न घडलेल्या बलात्काराचं सत्य 'असं' समोर
बलात्काराचे दोन आरोप निघाले खोटे
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 9:17 AM

हैदराबाद : बलात्कारासारखे गंभीर आरोप केल्यामुळे एखाद्या निर्दोष पुरुषाचं आयुष्य विनाकारण अडचणीत येऊ शकतं. त्याचप्रमाणे अशा खोट्या आरोपांचे प्रमाण वाढल्यास खऱ्या पीडितांच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती वाढते. 500 सीसीटीव्ही कॅमेरे, 800 तासांचे फूटेज, जवळपास 200 जणांची चौकशी केल्यानंतर बलात्काराच्या दोन खोट्या तक्रारीचं बिंग फुटलं. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या हुशारीमुळे दोन निर्दोष व्यक्तींची सुटका झाली.

काय आहे प्रकरण?

गांधी हॉस्पिटल आणि संतोष नगर भागात झालेल्या दोन बलात्कारांच्या प्रकरणाचा तपास हैदरबाद पोलीस करत होते. प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांची अनेक पथकं कामाला लागली. जवळपास 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील 800 तासांचे फूटेज तपासण्यात आले, तर अंदाजे 200 जणांची चौकशी करण्यात आली.

बलात्काराचे आरोप निघाले खोटे

तपासामध्ये सामूहिक बलात्काराच्या दोन्ही तक्रारी खोट्या असल्याचं समोर आलं. त्यामुळे दोन निर्दोष व्यक्ती नाहक गजाआड जाण्यापासून बचावल्या. बलात्काराचे खोटे आरोप करण्यामागे काय कारण होतं, याचा तपास पोलीस करत आहेत. बलात्काराचे खोटे आरोप करणाऱ्यांना काय शिक्षा होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महिला पोलिसाचा लिव्ह इन पार्टनरवर आरोप

दुसरीकडे, लिव्ह इन पार्टनरने आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत महिला पोलिसाने खळबळ उडवून दिली आहे. उत्तर प्रदेशातील महराजगंज जिल्ह्यात संबंधित महिला पोलीस निरीक्षक आपल्या बॉयफ्रेण्डसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचं बोललं जातं. मात्र महिलेनेच आपल्याला जबरदस्ती डांबून ठेवत खोट्या आरोपाखाली अडकवलं आहे, असा दावा विवाहित आरोपी तरुणाने केला आहे. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करत तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

लिव्ह इन पार्टनरकडून बलात्काराचा प्रयत्न, महिला पोलीस निरीक्षकाच्या आरोपांनी खळबळ

लिव्ह इन संबंधातून मूल, तरी पहिल्या नवऱ्याला घटस्फोटास नकार, तरुणाकडून विवाहित प्रेयसीची हत्या

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.