‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेत्रीला अटक, प्रियकराच्या 3 वर्षीय भाच्याचं अपहरण आणि…
'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेत्रीकडून प्रेमासाठी काहीपण..., प्रियकराच्या 3 वर्षीय भाच्याचं शाळेतून अपहरण आणि..., पोलिसांकडून मोठी माहिती समोर..., सध्या सर्वत्र घटनेची चर्चा...
पोलिसांनी रविवारी पालघर जिल्ह्यातून ‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेत्री शबरीन हिल अटक केली आहे. प्रियकराच्या तीन वर्षीय भाच्याचं अपहण केल्याचे आरोप शबरीन हिच्यावर आहेत. प्रियकर बृजेश सिंह याच्या कुटुंबावर नाराजी व्यक्त करण्यासाठी शबरीन हिने प्रियकराच्या भाच्याचं अपहण केल्याचं सांगण्यात येत आहे. कारण बृजेश यांच्या कुटुंबियांना दोघांच्या लग्नासाठी नकार दिला होता. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. अभिनेत्री शबरीनने ‘क्राइम पेट्रोल’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे. तिने अपहरण केल्याचा आरोप असलेल्या मुलाचा काका ब्रिजेश सिंह याच्याशी तिचे प्रेसंबंध होते. दोघेही वेगवेगळ्या समाजातील असल्यामुळे कुटुंबाने त्यांच्या नात्याला विरोध केला.
शबरीन, ब्रिजेश सिंह याच्या प्रेमात इतकी वेडी होती की, आपण काय करतोय याचं तिला भान देखील नव्हतं. वरिष्ठ पोलीस अधिकारी जयराज रानवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शबरीन बृजेशच्या प्रेमात पूर्णपणे बुडलेली होती. ती स्वतःचे भान हरपून बसली. तिने क्राईम पेट्रोल सारख्या वास्तववादी मालिकांमध्ये काम केलं असताना देखील टोकाचं पाऊल उचललं…’
प्रियकराचा देखील आहे यामध्ये सहभाग?
या अपहरणात ब्रिजेश सिंहचाही हात होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत. ब्रिजेश एका अनोळखी महिलेसोबत दिसल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. शबरीन आणि ब्रिजेश अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, मात्र जात आणि धर्माच्या मतभेदांमुळे ब्रिजेशच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला मान्यता दिली नाही.
ब्रिजेशच्या कुटुंबियांवर नाराजी
ब्रिजेशच्या कुटुंबियांवर असलेली नाराजी व्यक्त करण्यासाठी शबरीन हिने टोकाचं पाऊल उचललं. कारण ब्रिजेशचे कुटुंबिया दोघांना विभक्त करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ब्रिजेशचा भाचा शाळेत होता. सकाळी 11 वाजता शबरीन शाळेत पोहोचली. सध्या याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.