Gold Price: औरंगाबादच्या सुवर्णदालनांत ग्राहकांची वर्दळ, सुबक गजान्त लक्ष्मीचे खास आकर्षण, वाचा आजचे भाव

व्यापारी वर्गात भेट म्हणून देण्यासाठी सोन्या-चांदीची नाणी आणि गजलक्ष्मी किंवा गजान्त लक्ष्मीच्या मूर्ती, सोन्या-चांदीच्या लक्ष्मीच्या फ्रेम बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. कमळात वसलेल्या लक्ष्मीचे वाहन हत्ती असल्याने गजान्त लक्ष्मीचे पूजन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केले जाते.

Gold Price: औरंगाबादच्या सुवर्णदालनांत ग्राहकांची वर्दळ, सुबक गजान्त लक्ष्मीचे खास आकर्षण, वाचा आजचे भाव
दिवाळीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 2:33 PM

औरंगाबादः लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने औरंगाबादमधील व्यापारी बाजारपेठा (Aurangabad Market) फुलल्याचे चित्र आहे. विविध व्यापाऱ्यांच्या दालनांमध्ये आज सकाळपासूनच लक्ष्मीपूजनाची (Diwali Festival) तयारी सुरु आहे. यानिमित्ताने सराफा बाजारांतही सोन्या-चांदीची नाणी आणि विविध सोन्या-चांदीच्या मूर्तींची आवक झाली आहे. व्यापारीवर्ग आज लक्ष्मीपूजनासाठी खास सोन्याची खरेदी करतात. त्यामुळे औरंगाबादेतही सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसत आहे.

औरंगाबादेत आज सोन्याचे भाव घसरले

औरंगाबादमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,050 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. एकूणच ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात घसरण झालेली दिसून आली. तर आज 04 नोव्हेंबर रोजी एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,000 रुपये एवढे नोंदले गेल्याची माहिती औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली. 03 नोव्हेंबर रोजी औरंगाबादच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,250 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,000 रुपये एवढे दिसून आले. चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे चित्र दिसून आले. यापूर्वी 02 नोव्हेंबर रोजी औरंगाबादमधील 22 कॅरेट सोन्याचे दर 47,650 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,400 रुपये प्रति तोळा एवढे होते. तर एक किलो शुद्ध चांदीचे दरही 67,500 रुपये एवढे नोंदवले गेले. 31 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 47,600 रुपये प्रति तोळा एवढे तर 24 कॅरेट सोन्याचे दर 48,500 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,800 रुपये एवढे नोंदले गेले. 28 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सोन्याचे भाव 47,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,600 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले.

GajLakshmi

व्यापारी वर्गात विविध दालनांमध्ये गजलक्ष्मीच्या पूजनाला महत्त्व

गजान्त लक्ष्मीचे खास आकर्षण

दिवाळीच्या निमित्ताने गेल्या तीन दिवसांपासून सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. बहुतांश ग्राहक सराफ्यात शुद्ध सोन्यात गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने येत असून ते अंगठीचा वेढ, लॉकिट खरेदी करत आहेत. तर महिलांचा एक मोठा वर्ग दागिने खरेदी करण्यासाठी विविध ब्रँडच्या सुवर्णदालनांमध्ये गर्दी करत आहे. यंदा लाइटवेट सोन्याच्या दागिने महिलांच्या पसंतीस उतरत आहेत. तर व्यापारी वर्गात भेट म्हणून देण्यासाठी सोन्या-चांदीची नाणी आणि गजलक्ष्मी किंवा गजान्त लक्ष्मीच्या मूर्ती, सोन्या-चांदीच्या लक्ष्मीच्या फ्रेम बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. कमळात वसलेल्या लक्ष्मीचे वाहन हत्ती असल्याने गजान्त लक्ष्मीचे पूजन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केले जाते. यानिमित्ताने बाजारात सुरेख नक्षीकाम केलेल्या सोन्या-चांदीच्या गजान्त लक्ष्मीच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत.

इतर बातम्या-

सोशल मीडियावरील मैत्रीतून 21 लाखांचा गंडा, आंतरराष्ट्रीय भामट्याला औरंगाबाद सायबर पोलिसांनी दिल्लीत गाठले

दिवाळीचा मुहूर्त साधत शिवसेनेचा विकासकामांचा डंका, औरंगाबाद शहरात झळकवले 200 आकाशदिवे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.