दोन दिवसात दीड कोटी रुपयांचे सोने जप्त, तस्करांना मुंबई विमानतळ अधिकाऱ्यांची मदत ?
मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीसोबतच सोने तस्करीचे प्रमाणदेखील वाढले आहे. मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसांत सुमारे दीड कोटी रुपयांचे सोने पकडण्यात आले आहे. कस्टम एअरपोर्ट इंटेलिजन्स युनीटच्या अधिकाऱ्यांनी सोने तस्करीचा भंडाफोट केला आहे.
मुंबई : मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीसोबतच सोने तस्करीचे प्रमाणदेखील वाढले आहे. मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसांत सुमारे दीड कोटी रुपयांचे सोने पकडण्यात आले आहे. कस्टम एअरपोर्ट इंटेलिजन्स युनीटच्या अधिकाऱ्यांनी सोने तस्करीचा भंडाफोट केला आहे. 25 ऑक्टोबर रोजी 70 लाख आणि 24 ऑक्टोबर रोजी 25 लाखापेक्षा जास्त मूल्य असलेले सोने जप्त करण्यात आलेले आहे.
विमानाच्या सीटखाली लपवून दुबईहून आणले सोने
मिळालेल्या माहितीनुसार इतिहाद फ्लाइटने अबुधाबीहून मुंबईला एक विमान येत होते. या विमानात सीटखाली लपवून जवळपास 70 लाखांहून अधिक किमतीचे सोने मुंबईत तस्करीसाठी आणले जात होते. विमानाच्या सीटखाली लपवून हे सोने प्रवाशांनी मुंबईत आणले होते. मात्र संशय आल्यानंतर तपास करण्यात आला. यामध्ये सीटखाली तब्बल 70 लाख रुपयांचे सोने सापडले. कस्टम एअरपोर्ट इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे हे सोने जप्त केले असून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
सोने तस्करीचा डाव हाणून पाडला
यासह, याच विमानातून आणखी एका प्रवाशाकडून 20 लाख रुपये मुल्य असलेले सोने जप्त करण्यात आले आहे. हे सोने प्रवाशाने त्याच्या जीन्स पॅन्टमध्ये लपवून आणले होते. तस्करांचा हा डावसुद्धा कस्टम एअरपोर्ट इन्टेलिजेन्सच्या अधिकऱ्यांनी हाणून पाडला.
इंडिगो फ्लाईटमध्येदेखील सोने तस्करी
त्याचप्रमाणे 24 ऑक्टोबर रोजीदेखील विमानतळ कस्टम एआययू युनिटने शारजाहून इंडिगो फ्लाईटमध्ये येणाऱ्या प्रवाशांकडून 25 लाखांचे सोने जप्त केले होते. हे सोने स्केटिंग किटच्या स्केटबोर्डच्या आत कॅव्हिटी बनवून लपवून आणण्यात आले होते. यावेळीदेखील विमानतळ कस्टम अधिकाऱ्यांनी तस्करांना पकडले. दरम्यान सलग दोन दिवस मुंबई विमानतळावर तस्करीसाठी आणलेले सोने जप्त केले जात असल्यामुळे मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तस्करांना मदत मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दाताच्या खाचेत गोल्ड प्लेटस बसवून तस्करी
सप्टेंबर महिन्यात सोने तस्करीचा एक अजब प्रकार समोर आला होता. दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी उझबेकिस्तानच्या दोन नागरिकांना ताब्यात घेतले होते. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल 951 ग्रॅम सोन्याचा साठा जप्त केला होता. बाजारपेठेत या सोन्याची किंमत तब्बल 45 लाख रुपये इतकी होती. या दोन उझबेकिस्तानी नागरिकांनी सोन्याच्या तस्करीसाठी जी पद्धत वापरली होती, ती खरोखर थक्क करणारी होती. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोघांची कसून तपासणी केली तेव्हा या दोघांनी तोंडात सोने लपवल्याचे समोर आले होते. या दोघांच्या तोंडात सोन्याचे कृत्रिम दात बसवले होते. तसेच काही दात काढून त्या खाचेत सोन्याच्या प्लेटस बसवण्यात आल्या होत्या. याशिवाय, त्यांच्या तोंडात सोन्याच्या चेनही कोंबल्या होत्या.
इतर बातम्या :
4 साथीदार, 4 महिने प्लॅनिंग, विम्याच्या 37 कोटींसाठी मनोरुग्णाचा खून, नगर हादरलं
Bangladesh Voilence: फेसबुक फॉलोवर्स वाढवण्यासाठी बांगलादेश हिंसा भडकली?, नेमकं काय घडलं?
Bank Holiday List : नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद राहणार, शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासा#Bankholidaylist #bankholidaynews #bankholidays #banknews #bankingservices #hdfcbank #ICICIbank #punjabnationalbank#sbi https://t.co/Q9OWK6i1oT
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2021
Customs Airport Intelligence Unit seizes gold worth of 70 lakh in two days