Noida Suicide : ग्रेटर नोएडामध्ये कस्टम अधिकाऱ्याची आत्महत्या, 25 व्या मजल्यावरून मारली उडी

बिसरख परिसरातील सुपरटेक इको व्हिलेज-2 सोसायटीमध्ये प्रधान आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. रविवारी अचानक प्रधान यांनी 25 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Noida Suicide : ग्रेटर नोएडामध्ये कस्टम अधिकाऱ्याची आत्महत्या, 25 व्या मजल्यावरून मारली उडी
गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 5:16 PM

नवी दिल्ली : ग्रेटर नोएडा (Greater Noida)त एका कस्टम अधिकाऱ्या (Custom Officer)ने इमारतीच्या 25 व्या मजल्यावरुन उडी घेऊ आत्महत्या (Suicide) केल्याची घटना रविवारी घडली आहे. मयत अधिकारी ठाणे बिसराख भागातील एका सोसायटीत राहत होता. शिरीष प्रधान (45) असे आत्महत्या करणाऱ्या कस्टम अधिकाऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रधान यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत सखोल तपास आणि चौकशी करत आहेत.

पोलीस तपासानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल

बिसरख परिसरातील सुपरटेक इको व्हिलेज-2 सोसायटीमध्ये प्रधान आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. रविवारी अचानक प्रधान यांनी 25 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस कुटुंबीय आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी करून माहिती गोळा करत आहेत. पोलीस तपासानंतरच आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिस आयुक्त आलोक सिंह यांनी सांगितले.

मानसिक तणावातून तिहेरी आत्महत्येच्या अन्य घटना

इकोटेक-3 परिसरातील हबीबपूर गावात राहणाऱ्या एका महिलेने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रोली दिलीप (27) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रोलीने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरी घटना पोलीस स्टेशन फेज-2 परिसरात घडली आहे. फेज-2 परिसरातील रहिवासी प्रदीप रावत यांचा मुलगा पंकज रावत यानेही मानसिक तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिसरी घटना सुरजपूर परिसरात घडली आहे. प्रेमात अशयस्वी झाल्यामुळे एका विद्यार्थ्याने राहत्या घरी पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. रजनीकांत असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. (Customs officer commits suicide by jumping from 25th floor in Greater Noida)

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.