बॅचलर तरुणीने ‘बडे पापा’ला घरी बोलावलं, तसल्या साईटवर व्हिडीओ आला; त्यानंतर त्याने अचानक…

आसाममध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका कॉलेज तरुणीने ज्येष्ठ नागरिकासोबत संबंध ठेवून त्याचा अश्लील व्हिडीओ काढला. त्यानंतर तिने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

बॅचलर तरुणीने 'बडे पापा'ला घरी बोलावलं, तसल्या साईटवर व्हिडीओ आला; त्यानंतर त्याने अचानक...
old man diedImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 11:12 PM

दिसपूर : आसामच्या जोरहाट जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका 72 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली आहे. एका पोर्न साईटवर आपला व्हिडीओ पाहिल्यानंतर तोंड दाखवायला जागा न राहिल्याने या व्यक्तीने जीव दिला आहे. एका कॉलेजमधील तरुणीशी सेक्स करतानाचा हा व्हिडीओ होता. तो कुणी तरी पोर्न साईटवर अपलोड केला. त्यामुळे हा ज्येष्ठ नागरिक तणावात होता. त्यातून त्याने हे कृत्य केलं. विशेष म्हणजे हा व्यक्ती अविवाहित होता. या घटनेनंतर सदर तरुणीला अटक करण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आले. त्यामुळे पोलीस दबावाखाली आले आणि त्यांनी तरुणीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

जोरहाट जिल्ह्यातील ढेकेलिया येथीलहे प्रकरण आहे. आरोपी तरुणीचं नाव पूजा (नाव बदललं आहे) आहे. पूजा या बुजुर्ग व्यक्तीच्या ओळखीची होती. ती त्यांना बडे पापा म्हणून हाक मारायची. ती त्यांच्या घरीही येत जात होती. एकदा तिने या बडे पापाला घरी बोलावलं. त्यावेळी ती घरात एकटीच होती. मुलीच्या वयाची मुलगी म्हणून तोही तिच्या घरी गेला. त्यानंतर तिच्याशी तो गप्पा मारू लागला. बोलता बोलता तिने या बडे पापाला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उद्युक्त केलं. दोघांनी शारिरीक संबंधही ठेवले. मात्र, पूजाने याचं चित्रीकरण केलं होतं. त्याची बडे पापाला खबरबातही नव्हती.

हे सुद्धा वाचा

औषधाच्या बहाण्याने

पूजाने बडे पापांना औषधाच्या बहाण्याने नशेच्या गोळ्या दिल्या होत्या. त्यामुळे काय चाललं याचं बडे पापाला भान राहिलं नव्हतं, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या बडे पापाने गावकऱ्यांना हा संपूर्ण प्रकार सांगितला होता. त्याला पूजा ब्लॅकमेल करत असल्याचंही त्याने सांगितलं होतं. अखेर त्यांचा व्हिडीओ पोर्न साईटवर आला. त्याची माहिती मिळाल्याने बडे पापा प्रचंड तणावात आला आणि त्याने आत्महत्या केली. बडे पापाचा मोबाईल चेक केल्यानंतर त्यात हा अश्लील व्हिडीओ आढळून आला आगहे.

अनेक व्हिडीओ सापडले

या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले. त्यांनी आंदोलन करत पूजाच्या अटकेची मागणी केली. पोलिसांनीही प्रसंगाचं भान राखून पूजाला अटक केलं. पोलिसांनी पूजाची कसून चौकशी केली असता तिचे आणखी काही व्हिडीओ सापडले आहेत. या व्हिडीओतील लोकांनाही तिने ब्लॅकमेल केलं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मित्रावर आरोप

पूजा ही कॉलेज तरुणी आहे. तिने तिच्या वर्गमित्रासोबत मिळून अश्लील व्हिडीओ तयार केले होते. या मित्रानेच व्हिडीओ लीक केल्याचा आरोप तिने केला आहे. तर या विद्यार्थ्याने पूजावरच आरोप केला आहे. पूजानेच आपल्याला या प्रकरणात फसवल्याचं त्याने म्हटलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.