Fake Loan Apps : काही सेकंदात रिकामं होऊ शकतं अकाऊंट, चुकूनही डाऊनलोड करू नका अनोळखी अॅप्स

सायबर दोस्त (Cyber ​​Dost) हे गृह मंत्रालया(Home Ministry)चे ट्विटर हँडल (Twitter Handle) आहे, जे सायबर सुरक्षेसंबंधीची (Cyber ​​Dost Alert Fake Loan Apps) माहिती शेअर करत असते.

Fake Loan Apps : काही सेकंदात रिकामं होऊ शकतं अकाऊंट, चुकूनही डाऊनलोड करू नका अनोळखी अॅप्स
सायबर क्राइम
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 7:56 PM

मुंबई : भारतात ज्या वेगाने डिजिटल पेमेंट वाढतेय, त्याच गतीने सायबर गुन्हे(Cyber Crime)देखील वाढत आहेत. सायबर गुन्हेगार नवीन मार्गाने लोकांना फसवत आहेत. कोरोना(Corona)च्या काळात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे खबरदारीची गरज आहे. याबाबत केंद्र सरकार(Central Government)ने नुकताच जनतेला अलर्ट जारी केला आहे. कर्ज देण्याच्या नावाखाली खोट्या अॅपच्या फसवणुकीपासून सावध राहा, सायबर गुन्हेगारांपासून जनतेचे संरक्षण करण्यासाठी सायबर दोस्त सतर्क झाले आहे. सायबर दोस्त (Cyber ​​Dost) हे गृह मंत्रालया(Home Ministry)चे ट्विटर हँडल (Twitter Handle) आहे, जे सायबर सुरक्षेसंबंधीची (Cyber ​​Dost Alert Fake Loan Apps) माहिती शेअर करत असते.

लिंकही उघडू नका सायबर दोस्त आपल्याला अशा बनावट अॅप्सपासून सावध राहण्याचा इशारा देतात, जे कमी व्याजदरात कर्ज देतात. ‘सायबर दोस्त’ने ट्विट केले आहे, की सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बनावट अॅप्सपासून दूर राहा, माहिती घेतल्याशिवाय तुमच्या मोबाइलमध्ये कोणतेही बनावट अॅप डाउनलोड करू नका. तसेच संबंधित लिंक उघडू नका.

यूआरएल तपासा गृह मंत्रालयाने सायबर दोस्तमार्फत सांगितले, की कर्ज देणाऱ्या कंपन्यांची माहिती रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर शोधणे आवश्यक आहे. कोणतेही कर्ज देणारे अॅप डाउनलोड करताना काळजी घ्या, अन्यथा तुमची वैयक्तिक माहिती, डेटा धोक्यात येऊ शकतो. कागदपत्र, पेमेंट करताना संबंधित वेबसाइट किंवा URL तपासा.

पोलिसांच्या नावाने वापरतात पॉप-अप सायबर गुन्हेगार संगणक प्रोग्रामद्वारे पोलिसांच्या नावाने पॉप-अप वापरतात. अश्लील मजकुरामुळे वापरकर्त्याचा संगणक ब्लॉक करण्यात आल्याचा पॉप-अप अहवाल सायबर गुन्हेगार पोलिसांच्या नावाने पाठवतात. पॉप-अपमध्ये असेही म्हटले आहे, की संगणक अनब्लॉक करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.

पेमेंट करू नका ‘सायबर दोस्त’ने अशा नोटिफिकेशनपासून सावध राहण्यास सांगितले आहे. आपल्या संगणकाच्या अँटीव्हायरस प्रोग्रामवर वेळोवेळी क्लिक करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, तुम्हाला पॉप-अपमध्ये पैसे देण्यास सांगितले असल्यास, कोणतेही पेमेंट करू नका. तसेच, पॉप-अप किंवा मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

Zoomcar : तुमच्याकडे कार आहे का? महिन्याला कमवा 20 ते 30 हजार; कसे ते वाचा…

Drishyam च्या दिग्दर्शकाच्या घरी शानदार इलेक्ट्रिक कारची एंट्री, जाणून घ्या कारची खासियत

North Koria: उत्तर कोरियात 11 दिवस हसण्यालाही बंदी, किम जोंग उनने जाहीर केला राष्ट्रीय शोक

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.