कॉलबॉयच्या जाहिरातीला डायमंड वर्कर भुलला, नग्न फोटो व्हायरल, 29 हजारांना फसवणूक

ऑनलाईन नोकरीच्या शोधात असताना फेसबुकवर जिनल मेहता नावाच्या तरुणीचे अकाऊंट त्याने पाहिले. ज्यामध्ये कॉलबॉयची गरज असून रोज पाच हजार रुपये मिळतील अशी जाहिरात देण्यात आली होती.

कॉलबॉयच्या जाहिरातीला डायमंड वर्कर भुलला, नग्न फोटो व्हायरल, 29 हजारांना फसवणूक
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 8:29 AM

गांधीनगर : आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या एका शेतकऱ्याने फेसबुकवर मुलीच्या नावाने बनावट अकाऊण्ट (Fake Facebook Account) तयार केले. त्यावर कॉलबॉय म्हणून नोकरी देण्याची जाहिरात पोस्ट केली. हिऱ्यांच्या दुकानात नोकरी करणारा एक कामगार या जाहिरातीला भुलला. त्याने शेतकऱ्याच्या खात्यावर 29 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मुलगी असल्याचे भासवणाऱ्या शेतकऱ्याने पीडित तरुणाकडे नग्न फोटो-व्हिडीओंची मागणी केली. ते पाठवताच आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केले. जेव्हा तक्रारदार तरुणाला कॉल बॉयचे कामही मिळाले नाही आणि आपले फोटो नातेवाईकांपर्यंत पोहोचल्याचं समजलं, तेव्हा त्याला आपली फसवणूक (Cyber Crime) झाल्याचं लक्षात आलं. गुजरातमधील भावनगरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी शेतकऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

29 वर्षीय कामगाराने सुरतच्या सायबर क्राईम पोलिसात तक्रार दाखल केली होती. पीडिताने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तो अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत होता. त्याला पैशांची नितांत गरज होती. तो ऑनलाईन नोकरीच्या शोधात असताना फेसबुकवर जिनल मेहता नावाच्या तरुणीचे अकाऊंट त्याने पाहिले. ज्यामध्ये कॉलबॉयची गरज असून रोज पाच हजार रुपये मिळतील अशी जाहिरात देण्यात आली होती.

दोन हजार रुपये ट्रान्सफर

तक्रारदार तरुणाने जाहिरातीत खाली दिलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज केला. त्याला 6 महिन्यांच्या नोकरीसाठी 1000 रुपये आणि एक वर्षाच्या नोकरीसाठी 2000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्याने गुगल पेवर वर्षभरासाठीचे दोन हजार रुपये ट्रान्सफर केले. श्वेता नावाच्या मुलीने त्याला व्हॉट्सअॅपवरून हॉटेल बुक करणार असल्याचे सांगितले.

माझ्या वडिलांचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे, म्हणून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. सध्या हॉटेल बुकिंगसाठी सहा हजार रुपये ट्रान्सफर करा, असं तिने सांगितलं. त्या तरुणीने पीडित युवकाकडून वेगवेगळ्या कारणास्तव 29 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले.

नग्न फोटो-व्हिडीओ व्हायरल

या प्रकरणी सुरत सायबर सेलचे एसीपी युवराज सिंह गोहिल यांनी सांगितले की, मुलीने हिरे कामगाराकडे त्याचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ मागितले, त्याने ते मुलीला पाठवले. मात्र तरुणीने ते फोटो आणि व्हिडिओ कामगाराच्या नातेवाईकांना पाठवत व्हायरल केले. सुरतच्या सायबर क्राईम पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी भीमाभाई उर्फ ​​भीमो राजूभाई भम्मर याला अटक केली. तो भावनगर गावात शेती करत असे. या प्रकरणी आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

कस्टमर केअरला फोन केला, बँकेच्या माहितीची लिंक भरून पाठविली; गमावले साडेचार लाख

 सावधान! ओमिक्रॉन चाचणीच्या नावाखाली होतेय फसवणूक; सायबर गुन्हेगार झाले सक्रीय

काही सेकंदात रिकामं होऊ शकतं अकाऊंट, चुकूनही डाऊनलोड करू नका अनोळखी अॅप्स

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.