धक्कादायक… बायकोच्या बेडरुमपासून बाथरूमपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे, नवऱ्याने का केलं असं?; प्रकरण बरंच तापलंय

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. संशयी पतीने पत्नीच्या बेडरूममध्येच सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं आहे.

धक्कादायक... बायकोच्या बेडरुमपासून बाथरूमपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे, नवऱ्याने का केलं असं?; प्रकरण बरंच तापलंय
Wife BedroomImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 6:57 AM

भोपाळ : मध्य प्रदेशातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. छतरपूर येथील हे प्रकरण आहे. एका महिलेने तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. माझा नवरा माझ्यावर संशय घेतोय. त्याने माझ्या बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टॉयलेट आणि बाथरूमही कव्हर होत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा हा आरोप ऐकून पोलिसांचीही झोप उडाली आहे.

या महिलेने एसपी कार्यालयापर्यंत तक्रार दिली आहे. तसेच या प्रकरणी नवऱ्यावर कारवाई करण्याची मागणी तिने केली आहे. पोलिसांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. सीताराम कॉलनीत हा धक्कादायक प्रकार घडला. राजेश (नाव बदलेलं आहे) हा शिक्षक आहे. तो मुकरवा गावात शिक्षक म्हणून नोकरी करतो. 16 वर्षापूर्वी 2007मध्ये मीना शर्माशी (नाव बदलले आहे) त्याचा विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला होता.

हे सुद्धा वाचा

एकाच घरात वेगळ्या रुममध्ये

राजेशचं शाळेतील शिक्षिकेसोबत अफेअर सुरू असल्याचा मीनाला संशय आहे. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद होत असतो. एवढेच नव्हे तर हा वाद इतका टोकाला पोहोचला की दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण आता कोर्टात आहे. त्यामुळे हे दोघेही पती-पत्नी एकाच घरात राहून वेगवेगळ्या खोलीत राहतात.

पोलीस चौकशी सुरू

मी मुलांसह घर सोडून निघून जावं अशी पतीची इच्छा आहे. कारण त्याला दुसरं लग्न करायला मिळेल, असा आरोप मीनाने केला आहे. मी घर सोडून जावं म्हणून त्याने माझा छळ सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून माझ्या बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यात घरातील सर्व हालचाली रेकॉर्ड होत आहेत. त्यामुळे घरात राहणंही कठीण झालं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याला काय पाहायचं आहे? त्यामागचा त्याचा हेतू काय आहे? त्याच्या या कारनाम्यामुळे माझी प्रायव्हसी अडचणीत आली आहे, असं या महिलेने तक्रारीत म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. तसेच पतीवर कारवाई करावी, अशी मागणी या महिलेने तक्रार अर्जातून केली आहे. या महिलेच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. या महिलेच्या घरी जाऊन सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले जाणार असून तिच्या पतीचीही कसून चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Non Stop LIVE Update
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.