ATM Fraud | ना पिन शेअर केला ना OTP, मुंबईत 22 ग्राहकांच्या खात्यातून 2.24 लाख काढले कसे?

संध्याकाळी 7:30 ते रात्री 10:30 या वेळेत हे ट्रँझॅक्शन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कार्ड स्किमरचा वापर करुन एटीएम कार्डचे डिटेल्स कॅप्चर केले आणि क्लोनिंग करुन एटीएम मशिनमधून पैसे काढले, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

ATM Fraud | ना पिन शेअर केला ना OTP, मुंबईत 22 ग्राहकांच्या खात्यातून 2.24 लाख काढले कसे?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 12:06 PM

मुंबई : बँकेशी संबंधित कुठलेही तपशील शेअर न करताच आर्थिक गंडा बसल्याची तक्रार मुंबईतील काही ग्राहकांनी केली आहे. तीन तासांच्या अवधीत तब्बल 22 जणांना एकूण 2.24 लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे. या ग्राहकांच्या खात्यातून एटीएमद्वारे पैसे काढण्यात आल्याचं समोर आलं आहे. एटीएममधून व्यवहार केल्यानंतर स्कॅमरद्वारे त्यांच्या माहितीची चोरी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती आहे. 11 ते 22 नोव्हेंबर या काळात बेस्ट ट्रेनिंग स्कूलमध्ये वरिष्ठ प्रशासकीय पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत आपले 2.7 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटलं आहे.

कार्ड स्किमरद्वारे क्लोनिंगचा संशय

संध्याकाळी 7:30 ते रात्री 10:30 या वेळेत हे ट्रँझॅक्शन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कार्ड स्किमरचा वापर करुन एटीएम कार्डचे डिटेल्स कॅप्चर केले आणि क्लोनिंग करुन एटीएम मशिनमधून पैसे काढले, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

खात्यातून 29 व्यवहार

आपल्या खात्यातून 29 व्यवहार झाल्याचा उल्लेख फिर्यादीने तक्रारीत केला आहे. बँक अधिकाऱ्यांनी हे प्रकरण निस्तरण्यात कुठलीही घाई दाखवली नाही, मला माझे पैसे परत मिळणार का, हेही माहित नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे. मात्र ग्राहक किंवा पोलिसांकडून कुठलीही तक्रार आलेली नाही, असा दावा एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याने केल्याचं वृत्त ‘टाईम्स नाऊ’ने दिलं आहे. बँकेकडे असे प्रकार रोखण्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या :

चहा बनवताना लेकीचं डोकं उडवलं, छाटलेल्या मुंडक्यासह आई-भावाचा सेल्फी, औरंगाबादेत थरार

तीन बेपत्ता मित्र तलावात 30 फूट खोल मृतावस्थेत, शेवटच्या क्षणी काय घडलं? एकही साक्षीदार नाही जिवंत

Param Bir Singh | परमबीर सिंह यांना अटकेची धाकधूक, सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ मिळणार?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.