Mumbai Crime : ‘You tube वरचा अश्लील व्हिडीओ डिलीट करा’ असं सांगत आजोबांना लुबाडलं
आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिल्ली पोलीस आयुक्तांच्या नावाचा वापर करुन या माणसानं वृद्ध इसमाला लुबाडलं
मुंबई : युट्युबवर अपलोड (You tube Upload video) केलेला अश्लील व्हिडीओ डिलीट करा, असं सांगत एका वृद्ध इसमाला मुंबईत गंडा घालण्यात आला. 71 वर्षांच्या वृद्ध इसमाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार मालाडमध्ये (Malad Police Station) उघडकीस घडलाय. एका माणसानं या वृद्ध इसमाला फोन केला. त्याला आपण पोलीस असल्याची बतावणी केली. तुम्ही युट्युबवर अपलोड केलेला अश्लील व्हिडीओ हटवा, नाही तर तुम्हाला सीबीआयकडून अटक (CBI Arrest) केली जाईल, असं सांगून या वृद्ध इसमाची फसवणूक करण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणेज दिल्ली पोलीस आयुक्तांच्या नावाचा वापर करुन या माणसानं वृद्ध इसमाला लुबाडलं आहे. या माणसानं पोलीस असल्याचं सांगत भीती दाखवून दीड लाख रुपये उकळलेत. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर याप्रकरणी धक्कादायक खुलासे करण्यात आलेत.
‘अस्थाना’… पोलीस नसताना!
अस्थाना नाव असल्याचं सांगत एका इसमानं मालाडमध्ये राहणाऱ्या एक वृद्ध इसमाला फोन केला. आपण दिल्ली पोलीस आयुक्त असल्याचा दावा केला. तुमचा युट्युबवर एक अश्लील व्हिडीओ अपलोड झालाय. तो तुम्ही तातडीनं डिलीट केला नाही, तर तुम्हाला अटक होऊ शकते, असं सांगितलं. सीबीआय अटकेच्या भीतीनं वृद्ध इसमही घाबरला.
यानंतर अस्थाना नाव असल्याचं सांगत फोन केलेल्या व्यक्तीनं या वृद्ध इसमाला राहुल शर्मा नावाच्या एका व्यक्तीचा मोबाईल नंबर दिला. व्हिडीओ काढून टाकण्यासाठी त्याची मदत घ्या, असंही सांगितलंय. त्यानंतर राहुलने पैसे व्हिडीओ डिलीट करण्यासाठी पैसे भरावे लागतील असं म्हटलं. त्यानुसार वृद्ध व्यक्तीनं या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्याचं समजून पैसेही पाठवले. त्यानंतर राहुलनं आणखी एक फोन केला. संबंधित व्हिडीओ डिलीट झाला असल्याचं सांगितंल आणि आणखी दोन व्हिडीओही तुमचे आहेत. ते डिलीट करण्यासाठी पुन्हा दीड लाख रुपये उकळले.
शंकेतून सगळं प्रकरण उघडकीस..
हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचं ध्यानात आल्यानंतर वृद्ध इसमानं आपल्या सोबत घडलेली हकीकद एका ओळखीच्या व्यक्तीला सांगितली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं या वृद्ध इसमाच्या लक्षात आलं. त्यानंतर याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मालाड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सध्या याप्रकऱणाचा तपास सायबर विभागाकडे देण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत आहेत. दीड लाख रुपये दिलेल्या या व्यक्तीसोबत घडलेल्या प्रकारानं सायबर गुन्हे किती गुंतागुंतीचे आहेत, ही बाब अधोरेखित झाली आहे.