Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा ट्रॅप आहे यात अडकू नका… प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखलेंसोबत नेमकं काय घडलं?

"हा मेसेज गेले अनेक दिवस फेसबुक मेसेंजर वर फिरतोय. कृपया कुणी तुम्हाला ही लिंक पाठवली तर ओपन करू नका. ओपन केलीत तर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना मेसेज जातील. ही एक व्हायरस लिंक आहे" असं शुभांगी गोखले सांगतात

हा ट्रॅप आहे यात अडकू नका... प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखलेंसोबत नेमकं काय घडलं?
Marathi Actress Shubhangi Gokhale
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 9:19 AM

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. खुद्द शुभांगी गोखले यांनीच फेसबुकवर पोस्ट लिहित याविषयी माहिती दिली आहे. “पुन्हा एकदा माझे अकाऊंट हॅक झाले आहे. माझ्या नकळत सर्वांना मेसेजमध्ये एक लिंक जात आहे. प्लीज ओपन करु नका” असं आवाहन त्यांनी आपल्या फेसबुक फ्रेण्ड्सना केलं आहे.

काय आहे शुभांगी गोखले यांची फेसबुक पोस्ट

“पुन्हा एकदा माझे अकाऊंट हॅक झाले आहे. माझ्या नकळत सर्वांना मेसेजमध्ये एक लिंक जात आहे. प्लीज ओपन करु नका. मी सायबर सेलशी बोलले आहे.” असं शुभांगी गोखलेंनी फेसबुकवर लिहिलं आहे. “हा मेसेज गेले अनेक दिवस फेसबुक मेसेंजर वर फिरतोय. कृपया कुणी तुम्हाला ही लिंक पाठवली तर ओपन करू नका. ओपन केलीत तर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना मेसेज जातील. ही एक व्हायरस लिंक आहे. तुम्ही जर क्लिक केलं तर ही लिंक तुम्हाला फेक युट्युब सारख्या दिसणाऱ्या साईटवर घेऊन जाते. जिथे मेसेंजर सारखंच पेज दिसतं, तिथे लॉग इन केल्याशिवाय व्हिडिओ दिसणार नाही असं सांगितलं जातं…हा ट्रॅप आहे यात अडकू नका.” असं आवाहन शुभांगी गोखलेंनी केलंय.

पाहा शुभांगी गोखलेंची फेसबुक पोस्ट

याआधीही, अनेक हिंदी-मराठी कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊण्टचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. सध्या फेसबुकवर अनेकांच्या मेसेंजरमध्ये अशा स्वरुपाच्या लिंक येताना दिसत आहेत. मात्र त्यावर क्लिक केल्यास तो मेसेज सर्व फेसबुक फ्रेण्ड्सना जातो. यापासून सावध राहण्याचं आवाहन सायबर तज्ज्ञांनी केलं आहे.

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा

अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत साकारलेल्या शकूच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच स्थान निर्माण केलं आहे. त्या या मालिका सोडणार असल्याच्याही चर्चा आहेत. याशिवाय ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतील त्यांची भूमिकाही गाजत आहे. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या लोकप्रिय मालिकेतील श्यामलची भूमिका त्यांनी अजरामर केली. तर काहे दिया परदेस, एका लग्नाची तिसरी गोष्ट, अग्निहोत्र यासारख्या मालिकांतील त्यांच्या व्यक्तिरेखा गाजल्या आहेत. तर अगंबाई अरेच्चा, बोक्या सातबंडे, झेंडा, स.. सासूचा, क्षणभर विश्रांती, बस्ता अशा अनेक चित्रपटांतही त्या झळकल्या आहेत.

संबंधित बातम्या :

फेसबुकवरील मैत्री महागात, नगरमध्ये सरकारी कर्मचाऱ्याची 2 लाख 30 हजारांना फसवणूक

आक्षेपार्ह फोटोंवरुन तरुणाचे ब्लॅकमेलिंग, अकरावीतील विद्यार्थिनीचा गळफास

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.