एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, मराठी अभिनेत्याला अटक

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध अभिनेते मयुरेश कोटकर यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, मराठी अभिनेत्याला अटक
eknath shinde
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 10:24 AM

ठाणे : ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. मराठी कलाकार मयुरेश कोटकर (Mayuresh Kotkar) यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली. कोटकर यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. (Marathi artist Mayuresh Kotkar arrested for posting objectionable statement on social media against Eknath Shinde)

काय आहे प्रकरण?

नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळीही मयुरेश कोटकर उतरले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

शिवसेना कार्यकर्त्यांची पोलिसात तक्रार

शिवसेना कार्यकर्त्यांकडून पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांना आज जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पनवेलच्या उपमहापौरांवर गुन्हा

रायगडचे आगरी खूप डेंजर आहेत, ते आपल्या घरात कोयते ठेवतात. त्यामुळे एअरपोर्टला नाव द्यायला आल्यास ते परत जाणार नाहीत, असं वक्तव्य सोशल मीडियावर केल्याने पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड (Jagdish Gaikwad) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंविषयी एकेरी शब्द वापरत गायकवाडांनी बदनामीकारक वृत्त खाजगी युट्यूब चॅनलवरुन प्रसारित केल्याचा आरोप आहे,

संबंधित बातम्या

बाळासाहेब की दि. बा. पाटील?, राज्य सरकारचं ठरलं, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबद्दल मोठा निर्णय!

VIDEO | रायगडचे आगरी खूप डेंजर, घरात कोयते ठेवतात, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यावर गुन्हा

(Marathi artist Mayuresh Kotkar arrested for posting objectionable statement on social media against Eknath Shinde)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.