AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावर फेक अकाऊंट, मॉडेलसारखं फोटोशूट, जर्मनीत डॉक्टर असल्याची थाप, मुंबईतील वकील महिलेला 15 लाखांना युवकाचा गंडा

जर्मनीत डॉक्टर असल्याचे सांगत सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईतील एका वकील महिलेची 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सोशल मीडियावर फेक अकाऊंट, मॉडेलसारखं फोटोशूट, जर्मनीत डॉक्टर असल्याची थाप, मुंबईतील वकील महिलेला 15 लाखांना युवकाचा गंडा
वैभव शिंदेला अटक
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 11:51 PM

सांगली : सोशल मीडियावरील (Social Media Scam) प्रलोभनांना अनेक जण बळी पडतात. असाच प्रकार सांगलीत (Sangli) घडला आहे. जर्मनीत डॉक्टर असल्याचे सांगत सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईतील एका वकील महिलेची (Mumbai Lawyer Lady) 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विटा येथील लेंगरे गावातील एका तरुणाने हा प्रताप केला आहे. त्याच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. (Sangli Vaibhav Shinde arrested by Sangli Vita Police for cheat Mumbai lawyer lady and take almost 15 lakh rs)

खोटया नावानं फेसबुक खातं, मॉडेल सारखं फोटो शूट

सांगलीच्या विटा जवळील लेंगरे येथे वैभव शिंदे हा राहतो. त्याने कोरोनाचा प्रादुर्भावमध्ये महाराष्ट्र आणि शहरे लॉकडाऊन झाली. त्यामुळे या काळात आधार होता तो मोबाइलचा. वैभवला देखील त्या लॉकडाऊन काळात मोबाईलचाच आधार होता. त्यामुळे त्या काळात वैभवने फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर शक्कल लढवत भरत जाधव या नावाने खोटे अकाउंट काढले. परदेशात राहतोय असे भासावे म्हणून त्याने मॉडेल सारखे फोटो काढून त्याने फेसबूक , इंस्टाग्राम वर पोस्ट करण्याचा सपाटा लावला. यानंतर त्यानं वैभव शिंदे यांनं अनेकांना धडाधड फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायला सुरुवात केली.यातील एक फ्रेंड रिक्वेस्ट मुंबईतील एका महिला वकीलाला पाठवली.

जर्मनीत डॉक्टर असल्याची थाप

फेसबुक आणि इन्स्टंग्राम या या सोशल मीडियावर वैभव शिंदे याने भरत जाधव या प्रोफाईलमध्ये तो जर्मनी या देशात डॉक्टर व्यवसाय करत असल्याची खोटी माहिती दिली होती.मुंबईतील या वकील महिलेने वैभवने बनवलेल्या अकाउंटवर चॅटिंग सुरू केले. कधी हिंदी, कधी मराठीत चॅटकरून वैभव शिंदे याने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वैभवने आपला मोबाईल क्रमांक महिला वकिलाशी चॅटद्वारे शेअर केला. त्यानंतर व्हट्सअपच्या माध्यमातूनही या दोघांचे चॅटिंग सुरू झाले. व्हॉटसअप द्वारे मसेजेस, फोन कॉल करुन आणखी विश्वास संपादन केला. मात्र यादरम्यान वेगवेगळी कारणे सांगून या महिला वकिलाकडून वैभव शिंदेने वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून तब्बल 14 लाख 92 हजार रुपये घेतले. ही रक्कम महिला वकिलांकडून घेताना त्याने आपली आई कोरोनाने आजारी आहे. आपले वडील आजारी आहेत. चुलते वारलेत, बहिणीच्या नव-याची प्रकृती गंभीर आहे. मुबईमध्ये आल्यावर पैसे देतो असे म्हणून पैसे घेतले.

7 जूनला खाती बंद

अखेरीस 7 जूनला वैभव शिंदे याने अचानक सोशल मीडियावरची आपली भरत जाधव नावाने काढलेली सगळी अकाऊंटस डीअक्टिव्हेट केली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच वकील महिलेने सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला. त्यावरून संबंधित नंबर सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावातील वैभव शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तत्काळ या वकील महिलेने विटा पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. शिवाय दोघांमधील संभाषणाचे आणि वैभव शिंदे यांना वेळोवेळी पैसे दिल्याचे पुरावे दिले. आणि विटा पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी त्याच्या वर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

ऑनलाईन परीक्षेत कॉपी कशी करायची, याचे धडे देणारे व्हिडीओ व्हायरल, या सायबर गुन्हेगारीवर आळा कसा बसणार?

चिनी आरोपींकडून 5 लाख लोकांची ऑनलाईन फसवणूक, ‘ही’ काळजी घ्या अन्यथा तुम्हीही बळी ठरण्याचा धोका

(Sangli Vaibhav Shinde arrested by Sangli Vita Police for cheat Mumbai lawyer lady and take almost 15 lakh rs)

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....