Swara Bhasker | वृद्धाला मारहाण प्रकरणात प्रक्षोभक ट्वीट, अभिनेत्री स्वरा भास्करविरोधात तक्रार
अब्दुल समद सैफी यांना चौघांनी 'जय श्रीराम' बोलण्यास भाग पाडल्याचा दावा केला जात आहे. त्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी प्रक्षोभक ट्वीट केल्याचा आरोप अभिनेत्री स्वरा भास्करवर आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये वृद्धाला झालेल्या मारहाणीचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. या घटनेशी संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker), ट्विटर इंडियाचे मनीष माहेश्वरी यांच्यासह काही जणांनी ट्वीट करत निषेध केला होता. त्यानंतर स्वरा, माहेश्वरी यांच्यासह अन्य ट्विटराईट्सच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Swara Bhasker Twitter India Head Manish Maheshwari Complaint Over UP Assault Posts)
वृद्धाला झालेल्या मारहाणी प्रकरणी प्रक्षोभक ट्वीट केल्याचा आरोप स्वरा भास्करवर आहे. वकील अमित आचार्य यांनी दिल्लीतील तिलक मार्ग पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.
काय आहे प्रकरण?
बुलंदशहरमधील अनूपशहर येथे राहणारे 72 वर्षीय अब्दुल समद सैफी 5 जूनला आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गाझियाबादला गेले होते. तिथे त्यांनी रिक्षा पकडली. या रिक्षामध्ये चार युवक बसले होते. अब्दुल समद सैफी यांना चौघांनी ‘जय श्रीराम’ बोलण्यास भाग पाडल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांची दाढी कापल्याचाही आरोप आहे. मारहाणीचा व्हिडीओ शूट करताना रिक्षामध्ये गाणं सुरु होतं. त्यामुळे ‘जय श्रीराम’ बोलण्याचा दबाव आणल्याचा आवाज ऐकू येत नाही, असाही दावा आहे.
पोलिसांनी दावा फेटाळला
दुसरीकडे, गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरवर माहिती दिली की अब्दुल समद सैफी हे ताविज बनवत असत, त्यावरुनच ही घटना घडली. सैफींच्या कुटुंबीयांनी मात्र पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. आपण या प्रकरणाची तक्रार करण्यसाठी पोलिसात गेलो असताना पोलिसांनी दोन हजार रुपये घेतले आणि परत जाण्यास सांगितलं, असा आरोप सैफींच्या मुलाने केला आहे. पीडित अब्दुल सैफी हे कारपेंटर आहेत, ते ताविज बनवत असल्याचा कुटुंबाने इन्कार केला.
स्वरा भास्करचे ट्विट काय?
Agree. I can believe a bunch of Muslims beat up an old Muslim man, but forced him to chant #JaiShriRam & cut off his beard?! That really the whole story? Anyway.. Love how Sanghis r conveniently ignoring the prime accused that Pravesh who beat the old man & forced him to chant! https://t.co/wv4XQFSRuj
— Swara Bhasker (@ReallySwara) June 15, 2021
हेही वाचा :
वादांच्या बाबतीत कंगनालाही देतेय तगडी टक्कर! वाचा अभिनेत्री स्वरा भास्करबद्दल…
(Swara Bhasker Twitter India Head Manish Maheshwari Complaint Over UP Assault Posts)